शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांत बाचाबाची

By admin | Updated: June 19, 2015 00:36 IST

प्रदूषण नियंत्रण बैठक : प्रश्न बाजूलाच, अधिकाऱ्यांना झोडपले

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात जर तुम्ही महानगरपालिकेच्या बाबतीत एवढी आक्रमक भूमिका घेत असाल तर मग प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांच्या बाबतीत गप्प का बसता, अशी रोखठोक विचारणा करीत विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी चांगलेच झोडपले. चोक्कलिंंगम् यांच्या भूमिकेमुळे प्रदूषणाच्या मुद्द्यापेक्षा वैयक्तिक प्रतिष्ठेवरूनच अधिकाऱ्यांत ‘तू-तू मैं-मैं’चा मुद्दा अधिक गाजला. विभागीय आयुक्त चोक्कलिंगम् यांनी गुरुवारी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा प्रदूषणाच्यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत चोक्कलिंगम् यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी एन. एच. शिवांगी यांना चांगलेच फैलावर घेतले. ‘ज्या पद्धतीने तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेला नोटिसा पाठविता, कारवाईचा इशारा देता त्या पद्धतीने तुम्ही इतर कारखान्यांच्या बाबतीत का घेत नाही. तेथे का तुमचा आवाज गप्प राहतो’, अशा शब्दांत शिवांगी यांना सुनावले गेले. ‘रंकाळा तलावातील मासे मेले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसताना त्याबाबत महापालिकेला कोणत्या मुद्द्यावर जबाबदार धरता. त्यांच्यावर क्लेम करता आणि कारवाईची भाषा कशी करता’, अशी विचारणा चोक्कलिंगम् यांनी केली. आयुक्तांसारख्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी तुमच्या कार्यालयात बोलावणे ही पद्धत चुकीची आहे. तुम्ही आधी ‘डेकोरम’ पाळायला शिका. जर काही काम असेल तर तुम्हीच आयुक्तांच्या कार्यालयात जावे, असा सल्लाही चोक्कलिंगम् यांनी शिवांगी यांना दिला. त्यावेळी काहीसे संतप्त झालेले शिवांगी यांनीही त्यांना तशाच शब्दांत उत्तर देताना ‘माझ्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपण त्यांना बोलाविले होते,’ असे सांगितले. चोक्कलिंगम् हे शिवांगी यांना झोडपत असताना महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी त्यात तोंड घातले. जैव वैद्यकीय कचऱ्याबाबतीत महानगरपालिकेकडे नोंद नसलेल्या साडेतीनशे डॉक्टरांना नोटिसा काढणे हा ‘नॉनसेन्स’ असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. मी वैद्यकीय प्रॅक्टिस करीत नसतानाही मलाही नोटीस बजावल्याचे डॉ. पाटील यांनी दिली. त्यावेळी कारवाईच्या नोटिसा कोणत्या कायद्यानुसार तुम्ही काढता ते एकदा सांगा, असे सांगत चोक्कलिंगम् यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांच्यासह चाळीसहून अधिक अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आपली नेमकी बाजू मांडण्यात सर्वच अधिकारी असमर्थ ठरले. (प्रतिनिधी)पंचगंगा प्रदूषणासारख्या संवेदनशील प्रश्नावर बैठक असल्याने यास पत्रकारही उपस्थित होते. ही बाब चोक्कलिंगम् यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सर्व पत्रकार व छायाचित्रकारांना बाहेर काढले आणि मगच बैठक सुरू केली. प्रदूषणाला महापालिका जबाबदार, तर ‘पंचतारांकित’ कारखान्यांच्या बाबतीत गप्प का?अडीच तास बैठकीत अधिकारी झाले अवाक