शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहूंचे चरित्र आता रशियन, चिनी भाषांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 00:10 IST

जयसिंगराव पवार यांची माहिती

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती यांचे चरित्र आता रशियन आणि चिनी या भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे संस्थापक-संचालक व मूळ मराठी ग्रंथाचे लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ही माहिती दिली. डॉ. पवार म्हणाले, २००१ साली प्रसिद्ध झालेले शाहू चरित्र कानडी, कोकणी, उर्दू, तेलगू, हिंदी, इंग्रजी व जर्मन अशा देशी-विदेशी भाषांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. एकूण १४ भारतीय भाषांत व १० विदेशी भाषांत शाहू ग्रंथ प्रकाशित करण्याचा संस्थेचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व रशियन भाषातज्ज्ञ डॉ. मेघा पानसरे व आणखी एक रशियन भाषातज्ज्ञ प्रा. तत्याना बीकवा यांनी शाहू चरित्राचा रशियन भाषेत अनुवाद केला आहे. डॉ. पानसरे या शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख असून, त्यांनी रशियन भाषेतील अनेक प्रकारचे साहित्य मराठी भाषेत अनुवादित केले आहे. प्रा. बीकवा या मूळच्या सेंट पीटसबर्ग येथील असून, त्या अनेक वर्षे भारतात वास्तव्यास होत्या. रशियन भाषाशिक्षिका म्हणून त्या कऱ्हाड येथे कार्यरत होत्या. त्या आता रशियाला वास्तव्य करीत असून, त्यांनी आणि मेघा पानसरे यांनी केलेल्या रशियन अनुवादाचा शाहू ग्रंथ लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. प्रा. ओ ताई ली या मूळच्या चीनमधील असून, फ्रान्समध्ये त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले, तर त्यांचे पदव्युत्तर शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. १८ वर्षे इंग्लंडमध्ये शैक्षणिक कार्य केल्यानंतर त्या सध्या पुण्यात चिनी भाषातज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इंग्रजीतील शाहू चरित्र वाचल्यानंतर प्रभावित होऊन ते चिनी भाषेत भाषांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्या गेले दोन दिवस कोल्हापुरात आल्या असून, त्यांनी शाहू जन्मस्थळापासून महाराजांशी संबंधित सर्व स्थळांना भेटी दिल्या आहेत. हे भाषांतराचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला संस्थेचे विश्वस्त सुरेश शिपूरकर, मेघा पानसरे, प्रा. ओ ताई ली, प्रा. मंजूश्री पवार, विजय शिंदे उपस्थित होते. शाहूंचे कार्य प्रेरणादायी महाराजांवरील ग्रंथ वाचल्यानंतर मी प्रभावित झाले. त्यांनी शिक्षण, रोजगार, उद्योग, समतेसाठी जे काम करून ठेवलं आहे, ते खरंच प्रेरणादायी आहे. यातूनच मी त्यांच्या चरित्राचे चिनी भाषेत भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. प्रा. ओ ताई ली, चिनी भाषांतरकार