शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आयओएन परिक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थांना प्रवेश नाकारला; केंद्राला टाळे ठोण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा

By विश्वास पाटील | Updated: August 13, 2023 19:19 IST

केंद्र चालकांचा हा मनमानी कारभार कित्येक दिवस विद्यार्थ्यांनी सहन करावा अशी विचारणा करत संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले.

कोल्हापूर : शिये (ता.करवीर ) येथील आय.ओ.एन परीक्षा केंद्रावर रविवारी आयबी पीएस क्लार्कच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे सोबत आणून देखील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने मोठा गोंधळ उडाला. प्रत्येक परीक्षेवेळी गोंधळ हेच या केंद्राचे वैशिष्ट्य बनले आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना आधार कार्ड पॅन कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी ओळखीचा पुरावा यासाठी एखादा कागदपत्रे लागतात परंतु सर्व कागदपत्र असताना देखील येथील केंद्र चालकांनी सुमारे 50 विद्यार्थ्यांना आधार कार्ड अपडेट नसल्याच्या कारणास्तव परीक्षेला बसू दिले नाही. 

केंद्र चालकांचा हा मनमानी कारभार कित्येक दिवस विद्यार्थ्यांनी सहन करावा अशी विचारणा करत संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी  तीन- चार वर्ष अभ्यास करत असतात. कराड पंढरपूर सोलापूर पुणे गोवा कोल्हापूर इथून विद्यार्थी येतात. मागील काही दिवसांपूर्वी दोन विद्यार्थ्यांच्याकडे मोबाईल आढळला विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला परंतु यांना सहकार्य करणाऱ्या केंद्र चालकांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. 

गोव्यामधून आलेल्या एका विद्यार्थ्याच्या आधार कार्डवर फोटो हुबेहूब दिसत नसल्याच्या कारणावरून त्याला प्रवेश नाकारला त्या विद्यार्थ्याने येताना केस कट करून आला होता. कोल्हापूर मधील एक विद्यार्थी 5 ऑगस्टला आयबीपीएस आर आर बी पीओ या परीक्षेसाठी बसला होता आज देखील त्याने या परीक्षेसाठी फॉर्म भरला होता त्या दिवशी त्याला सर्व कागदपत्रांसहित प्रवेश दिला आज तीच कागदपत्रे असताना त्याला परीक्षा केंद्र चालकांनी प्रवेश नाकारला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी केंद्र चालकांना या संदर्भात जाब विचारला असता त्यांनी तिथून पळ काढला.

विद्यार्थी 12 ते 14 तास अभ्यास करून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात परंतु या परीक्षा केंद्राच्या मनमानी कारभारामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली नाही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी पोलीस व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष निलेश सुतार, श्रीनाथ पाटील, नेहा पाटील, स्वाती पाटील, मिलिंद गिरवडे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा