शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

फोर्ड कॉर्नर येथील चॅनलचे काम सुरू, दीड महिना रस्ता राहणार बंद : वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:37 IST

फोर्ड कॉर्नर येथील कोल्हापूर अर्बन बँकेसमोरील आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले. त्यासाठी फोर्ड कॉर्नर ते टायटन शोरूमपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला आहे. हे काम ४१ दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, येथील व्यवसायावर परिणाम होणार आहे.

ठळक मुद्देफोर्ड कॉर्नर येथील चॅनलचे काम सुरू दीड महिना रस्ता राहणार बंद : वाहतुकीची कोंडी

कोल्हापूर : फोर्ड कॉर्नर येथील कोल्हापूर अर्बन बँकेसमोरील आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले. त्यासाठी फोर्ड कॉर्नर ते टायटन शोरूमपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला आहे. हे काम ४१ दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, येथील व्यवसायावर परिणाम होणार आहे.फोर्ड कॉर्नर ते टायटन शोरूम परिसर हा सखल भागात असल्यामुळे महापुरावेळी येथे चार ते पाच दिवस पाणी साठून राहिले होते. अनेकांच्या घरांमध्ये तसेच दुकानांमध्येही पाणी शिरले होते. उमा टॉकीज, अयोध्या टॉकीज परिसरातील सांडपाणी येथील ड्रेनेज लाईनमधून जाते. सखल भाग आणि जुन्या लाईनमुळे वारंवार गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत होते. तसेच परतीच्या पावसातही सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले होते.

यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने निधी मंजूर करून येथे आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम सुरू केले आहे. महापालिका विभागीय कार्यालय क्रमांक २, शिवाजी मार्केटअंतर्गत फोर्ड कॉर्नर येथील अर्बन बँकेच्या परिसरातील रस्ता बंद आहे.वाहतूक पर्यायी मार्गानेहा शहरातील महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे चॅनेलच्या कामादरम्यान वाहतुकीत अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे अयोध्या टॉकीज ते दसरा चौक व संभाजी पूल आणि व्हीनस कॉर्नर ते टायटन शोरूम या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांनी केले आहे.काम रखडू देऊ नकाहा रस्ता वाहतुकीसाठी किमान ४१ दिवस बंद राहणार आहे. यामुळे परिसरातील व्यापारावर परिणाम होणार आहे. खानविलकर पेट्रोल पंप येथे अशाच प्रकारचे काम सुरू असून, सहा महिन्यांपासून काम रखडले आहे. येथील व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अनुभव पाहता महापालिकेने काम रखडू देऊ नये, ते तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी फोर्ड कॉर्नर येथील व्यावसायिकांकडून होत आहे.

 

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका