कोल्हापूर : शहराच्या प्रवेशद्वारावरील ताराराणी चौकात ११ हजार चौरस मीटरच्या जागेवर सातमजली भव्य इमारत उभारण्याची योजना महापालिकेने आखली आहे. स्टार हॉटेल, बहुमजली पार्किंग, आय. टी. कार्यालये, महालक्ष्मी भक्तनिवास, मनपा कार्यालयांसह मल्टिप्लेक्स व मॉल असलेला हा प्रकल्प पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप(पीपीपी) धर्तीवर उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचे आज, मंगळवारी स्थायी समिती सभागृहात सादरीकरण झाले.ताराराणी चौकात महापालिकेची १११५५ चौरस मीटर जागा आहे. या जागेवर विभागीय कार्यालय व फायर स्टेशनसह व्यावसायिक गाळे आहेत. या जागेचे नूतनीकरण करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. नियोजित इमारतीमध्ये दोन मजल्यांवर पार्किंग व्यवस्था असेल. हॅलिपॅडसह व्यवस्था असलेल्या या इमारतीमध्ये १२० खोल्यांचे भव्य व आलिशान हॉटेल होणार आहे तसेच वाजवी दरात महालक्ष्मी भक्तांची राहण्याची सोय केली जाणार आहे. गोडावून, दुकानगाळ्यांसह कॉर्पोरेट कार्यालये व आय.टी. कंपन्यांसाठी लागणारी कार्यालये या इमारतीमध्ये बांधण्यात येणार आहेत. कार्यालयांसह सुसज्ज फायर स्टेशन असेल, अशी माहिती सादरीकरणावेळी देण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षल घाटगे, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.असा असेल आराखडाएकूण जागा : ११ हजार चौ.मी.दोन मजली पार्किंग व्यवस्था१२० खोल्यांचे हॉटेलमहालक्ष्मी भक्तनिवासमहापालिकेसह आयटी व कॉर्पाेरेट कार्यालये, लहान दुकानेएक मल्टिप्लेक्स व मॉल
ताराराणी चौकातील मनपा कार्यालयाचा होणार कायापालट
By admin | Updated: December 2, 2014 23:35 IST