शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नशीब बदलण्यासाठी विचार बदला

By admin | Updated: February 10, 2015 00:05 IST

प्रल्हाद पै : ‘गडहिंग्लज’मध्ये समाजप्रबोधन महोत्सवास प्रतिसाद

गडहिंग्लज : कर्माचे फळ कर्मात आणि विचाराचे फळ विचारातच आहे. विचाराला आकार द्या, जीवनाला आकार मिळेल. विचाराला शिस्त लावा, विचार व्यापक करा, विचार शुद्ध करा, तरच जीवनात चमत्कार घडेल. किंबहुना नशीब बदलण्यासाठी विचार बदला, असा मोलाचा सल्ला प्रल्हाद वामनराव पै यांनी दिला.सद्गुरू वामनराव पै प्रणीत जीवन विद्या मिशनतर्फे येथील म. दुुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित भव्य समाजप्रबोधन महोत्सवात ‘विचार बदला, नशीब बदलेल’ या विषयावर ते बोलत होते. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूूू एकटा सुखी होऊ शकत नाहीस, सुख पाहिजे, दिल्यानेच मिळणार’ या सद्गुरूंच्या तीन सिद्धांतावर त्यांनी सविस्तर व सोदाहरण विवेचन केले.पै. म्हणाले, नशीब म्हणजे पूर्वीच्या कर्माचे फळ आहे. आपणाला ते सुख व दु:खाच्या रूपाने मिळते. चांगले फळ मिळण्यासाठी पूर्वीचे सोडा, आजपासूनच चांगला विचार करा.सज्जन माणूस म्हणजे विचार चांगले असणारा माणूस. त्यासाठी आपल्या विचारांकडे लक्ष द्या. दु:खाचे, निराशेचे, अपयशाचे विचार अधोगतीकडे नेतात, तर सकारात्मक विचार प्रगतीकडे नेतात. चांगल्या फळासाठी चांगल्या विचारांचा प्रयत्न करा.जगातील सर्व मोठी माणसं अपयशातूनच घडली आहेत. त्यामुळे अपयशाने खचून जाऊ नका. वस्तुस्थितीचा स्वीकार करा, चुकले तरी मागे फिरू नका. प्रयत्नातूनच मार्ग निघतो. प्रयत्न करणाऱ्यांमागेच समाज उभा राहतो. त्यामुळे प्रयत्न करीत रहा. त्यातूनच नशीब बदलू शकते.नशीब म्हणजे केवळ पैसा आणि उत्कर्ष नव्हे. उत्कर्षाने माणूस उन्मत होण्याचा धोका आहे. त्यामुळे उत्कर्षाबरोबरच माणसाची कुवत, पात्रता आणि मानवी मूल्ये वाढली पाहिजेत. चारित्र्य घडायला हवे. तरच माणूस स्मरणात राहील, असेही पै यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)नेटके नियोजन, उदंड प्रतिसादगडहिंग्लज शाखेच्या नामधारकांनी ‘जीवन विद्या मिशन’तर्फे आयोजित समाजप्रबोधन महोत्सवाचे नेटके नियोजन केल्यामुळे या ज्ञानमहोत्सवास उदंड प्रतिसाद मिळाला. सुमारे दहा हजार नागरिकांनी या प्रवचनाचा लाभ घेतला.