शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

धोके टाळण्यासाठी मानसिकता बदला

By admin | Updated: February 4, 2017 00:40 IST

राजेंद्रसिंह राणा यांचा सल्ला : जलव्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन

कोल्हापूर : मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला असून, तो अधिक गुंतागुंतीचा व भयानक बनत चालला आहे. भविष्यातील पर्यावरणाचे धोके टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मानसिकतेत बदल करायला हवा, असा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शुक्रवारी दिला. येथील प्रा. डॉ. ए. डी. शिंदे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त सायबर महाविद्यालयात आयोजित स्मृती व्याख्यानमालेत ते ‘हवामान बदल समस्येवर पर्याय : जल व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पी. बी. साबळे होते. यावेळी विश्वस्त डॉ. व्ही. एम. हिलगे, डॉ. पी. एस. राव, डॉ. टी. एम. शिवारे, अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अमृतमहोत्सवानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा सत्कार करण्यात आला.जलतज्ज्ञ राणा म्हणाले, एकविसाव्या शतकात मानवासमोर ऋतुचक्रातील बदल व जागतिक तापमानवाढ या पर्यावरणाच्या प्रमुख गंभीर समस्या असणार आहेत आणि त्यास आपणच जबाबदार आहेत. सध्याची शिक्षणव्यवस्थाही उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचे जास्तीत जास्त शोषण कसे करता येईल, हेच शिकविते. दोनशे वर्षांपूर्वी इथली शिक्षणव्यवस्था मानव आणि निसर्ग यांच्यामधे दुवा साधणारे शिक्षण देणारी होती. ती आता लुप्त झाली आहे. स्वातंत्र्यानंतर दुष्काळ दहापटींनी, तर पूर परिस्थितीत आठपटींनी वाढली आहे. याला आपली जीवनशैलीच जबाबदार आहे. पर्यावरणसंबंधी धोरणे आखतानाही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना आवडतील असे सल्ले देणारेच सल्लागार असल्याने, आपण या परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलो नाही. आपल्या समाजातही पर्यावरणाबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. नद्या, नाले यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायद्यांपेक्षा नागरिकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. शिक्षणसंस्था, विद्यापीठांनी फक्त पुस्तकी ज्ञान न देता कृतिशील कार्यक्रमाची आखणी करून लोकशिक्षणाची मोहीम हाती घ्यायला हवी; तरच येणाऱ्या काळातील पर्यावरणाच्या आव्हानांना आपण सक्षमपणे तोंड देऊ शकू आणि या कामी राजर्षी शाहूंचा सामाजिक क्रांतीचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरने पुढाकार घ्यावा.स्वातंत्र्यानंतर दुष्काळ दहापटींनी, तर पूर परिस्थितीत आठपटींनी वाढलीपर्यावरणासंबंधी धोरणे आखतानाही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना आवडतील असे सल्ले देणारेच सल्लागार फक्त पुस्तकी ज्ञान न देता कृतिशील कार्यक्रमाची आखावेत