शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाने चंद्रकांतदादांची उडवली खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST

कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासह राज्यातील विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष ...

कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासह राज्यातील विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडविणाऱ्या प्रतिक्रियांचा शुक्रवारी सोशल मीडियावर चांगलाच धुरळा उडाला. त्यांतील काही पोस्ट तर अवमानजनक होत्या.

आमदार पाटील यांनी जी विधाने केली होती, त्यांचेच त्यावेळचे व्हिडीओ शेअर करून त्यांवर अत्यंत तिखट, विनोदी प्रतिक्रिया, गाणी सोशल मीडियावर शेअर झाली. आमदार पाटील यांची महाविकास आघाडीने चंपी केली, आता तरी बाबा तुम्ही बोलणं बंद करा... वाट लावली तुम्ही. आता तरी शांत बसा... अशा कॉमेंटही शेअर झाल्या. त्यासोबतच ‘सुन चंपा... सुन तारा... कोई जिता, कोई हरा... अरे बडा मजा आया... सुन लो मेरी बात...’ असे गाणेही वाजवले.

आमदार पाटील यांच्या अनेक विधानांनी या निवडणुकीतील चुरस वाढवली. ते वारंवार चुटकी वाजवून ‘आपण अगदी सहज सहाच्या सहा जागा निवडून आणू शकतो,’ असे म्हणत असत. राज्यात सत्तांतर झाले आहे. लोकमानस बदलले आहे, याचे भान त्यांच्याकडूनही सुटले होते. त्यामुळे मी चुटकी वाजवली की लोकही भाजपच्या आणि आमच्या मागे पळत येऊन उभे राहतात, असाच काहीसा त्यांचा व्यवहार व बोलणेही होते. मध्यंतरी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दलही काही विधाने केली. पुणे पदवीधरची निवडणूक तर आपण पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मोठ्या मताधिक्याने जिंकू व शिक्षक मतदार संघात टप्प्याटप्प्याने विजयापर्यंत पोहोचू असे ते जाहीरपणे सांगत असत. ‘ही निवडणूक सोडाच; यापुढील महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही लोक महाभकास आघाडीला उचलून फेकून देतील,’ असे विधान ते करीत असत. प्रत्यक्षात लोकांनी भाजप व चंद्रकांत पाटील यांनाच तसे फेकून दिल्याचे या निकालामधून दिसून आले.