जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा स्थितीत राज्यातील जनतेचा जीव वाचविण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. देशात चांगल्या पध्दतीने व्हॅक्सिन आपल्या राज्यात होत आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून पुरेसे व्हॅक्सिन मिळालेले नाही. त्यामुळे चिखलफेक, राजकारण करण्यापेक्षा चंद्रकांतदादांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह एखादे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जावे. महाराष्ट्राला डबल व्हॅक्सिन आणण्याचे काम पहिले करावे, अशी विनंती त्यांना मी करतो, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
चौकट
दूध उत्पादकांसाठी ‘गोकुळ’ची मोट बांधली
‘गोकुळ’च्या सत्तेसाठी नव्हे, तर दूध उत्पादकांना दोन रुपये जादा दर मिळावा, यासाठी मोट बांधली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी लढत आहे. मल्टिस्टेटचा लढा आम्ही जिंकल्याने संघ हा दूध उत्पादकांचा राहिला. त्यामुळे सत्ताधारी आज दूध उत्पादकांच्या दारोदारी फिरत आहेत. संघ मल्टिस्टेट केला असता, तर त्यांनी घरी बसून हजार कंपन्या रजिस्टर करून ‘गोकुळ’ची निवडणूक जिंकली असती. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला आणि ताईंच्या वक्त्याव्याला दूध उत्पादकच निवडणुकीत उत्तर देतील, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.