शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादा पुन्हा गरजले... हिंमत असेल तर एकट्याने लढा; दिले खुले आव्हान : शिवसेनेला काय मिळाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST

कोल्हापूर : माझे शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसला जाहीर आव्हान आहे की, त्यांनी हिंमत असेल तर आमच्याशी एकएकट्याने लढावे; ...

कोल्हापूर : माझे शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसला जाहीर आव्हान आहे की, त्यांनी हिंमत असेल तर आमच्याशी एकएकट्याने लढावे; मात्र या तीन पक्षांत ती हिंमत नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेतील सहा जागांचे कल स्पष्ट झाल्यावर व्यक्त केली.

आमदार पाटील म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रितपणे आमच्याशी लढत दिली. यामुळे या निकालांमध्ये काहीही धक्कादायक असे घडलेले नाही. हे होणारच होते; परंतु, तरीदेखील भाजपने महाविकास आघाडीला कडवी झुंज दिली आहे. निकालांमध्ये मुद्दा असा की, शिवसेनेला काय? मिळाले याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांची अमरावतीची जागा गेली. याउलट या निकालांमध्ये भाजपला निदान धुळे-नंदुरबार मतदारसंघात विजय मिळविता आला. मात्र शिवसेनेचे काय? शिवसेनेने अमरावतीची एकमेव जागादेखील गमावली; पण या निवडणुकीत सर्वाधिक फायदा झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसला. त्यांनी पुणे, औरंगाबाद व अप्रत्यक्षरीत्या अमरावती शिक्षक मतदार संघात विजय प्राप्त केला.

आमदार पाटील यांनी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूक फारच व्यक्तिगत प्रतिष्ठेची केली होती. पदवीधर मतदार संघातून त्यांनी यापूर्वी दोनदा प्रतिनिधित्व केले आहे. त्याअगोदर प्रकाश जावडेकर या मतदार संघातून दोन वेळा निवडून आले. गेल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सारंग पाटील यांनी त्यांना कडवी झुंज दिली होती. भाजपने बूथ पातळीवर नोंदणीपासून अन्य यंत्रणा फार पद्धतशीरपणे राबविली असल्याने आमचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा आत्मविश्वास ते व्यक्त करीत होते. प्रत्यक्षात तो अतिआत्मविश्वासच होऊन नडल्याचे निकालाने स्पष्ट केले.