शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांबाबत मुश्रीफ म्हणतात ... चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 16:10 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बदल्यांची सीआयडी मार्फत चौकशीची मागणी करत आहेत, ती आम्ही केव्हाच मान्य केली आहे. मात्र महायुतीच्या काळातील बदल्यांमध्ये अनेक विक्रम करणाऱ्यांकडून ही मागणी ऐकून आर्श्चयाचा धक्का बसला असून पाटील यांचे बदल्यांबाबतचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके चली बिली हजं को अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केली.

ठळक मुद्देबदल्यांबाबत मुश्रीफ म्हणतातचंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके...

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बदल्यांची सीआयडी मार्फत चौकशीची मागणी करत आहेत, ती आम्ही केव्हाच मान्य केली आहे. मात्र महायुतीच्या काळातील बदल्यांमध्ये अनेक विक्रम करणाऱ्यांकडून ही मागणी ऐकून आर्श्चयाचा धक्का बसला असून पाटील यांचे बदल्यांबाबतचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके चली बिली हजं को अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केली.चंद्रकांत पाटील हे महसूल, बांधकाम, कृषी, मदत, पुर्नवसन आदी महत्वाच्या विभागाचे मंत्री होते. त्यांनीच गेल्या सहा महिन्यात झालेल्या बदल्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीआयडी चौकशीची मागणी मान्य केलीच, त्याचबरोबर २०१४ पासून बदल्यांची चौकशी करू, असेही सांगितले आहे. मूळात कोरोनाच्या कालावधीत बदल्याच करू नये, असेच आघाडी सरकारचे धोरण होते. मात्र युती शासनात आणले गेलेले काही अधिकारी आजही त्यांच्या खाल्या मिठाला जागतात. त्यामुळे हेच अधिकारी महाविकास आघाडीला बदनाम करत आहेत. म्हणून बदल्या करण्याचा निर्णय घेतला, तेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अवघ्या १५ टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.त्या बदल्यांची अजूनही चर्चा आहे.......युती सरकारच्या काळातील व आता त्यांच्या खाल्या मिठाला जागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने चंद्रकांत पाटील यांचे पित्त खवळले आहे. मागील पाच वर्षात कशा पध्दतीने बदल्या झाल्या, याची अजूनही दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर