शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आजही शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार, पण निवडणुका स्वतंत्र लढवणारः चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 13:07 IST

राज्याच्या हितासाठी आज देखील शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांना अजूनही पडताहेत सत्तेची स्वप्नेम्हणाले..शिवसेनेसोबत बनू शकते सरकार

कोल्हापूर - राज्याच्या हितासाठी आज देखील शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.चंद्रकांत पाटील म्हणाले की राज्यामध्ये भाजपकडे सगळ्यात जास्त आमदार आहेत आणि भाजपच्याच मदतीने शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहेत. मोदींच्या सभांचा फायदा शिवसेनेला झाला आहे.अशावेळी शिवसेना विरोधात बसली असते तरी चालले असते, मात्र ते सत्तेसाठी दोन्ही काँग्रेससोबत गेल्याचा आरोप पाटील यांनी केला, त्यामुळे आगामी काळात जरी राज्याच्या हितासाठी एकत्र आलो तरी निवडणुका मात्र वेगळ्याच लढल्या जातील असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी या दोन्ही पक्षांना लक्षात आले नाही का? असं विचारलं असता आम्ही तयार होतो, मात्र शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली. ५६ आमदार असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद कसे द्यायचे असा सवाल देखील त्यांनी केला? त्यावेळी महत्त्वाची खाती शिवसेनेकडे देण्यासंदर्भात चर्चा झाली होती, मात्र शिवसेनेला ते मान्य नव्हते असंही ते म्हणाले.

या संदर्भातले सगळे निर्णय हे केंद्राच्या पातळीवरून होत असतात, त्यामुळे मोदींनी फॉर्म्युला तयार केला आणि उद्धव ठाकरेंनी तो मान्य केला तर या सगळ्या पुढच्या गोष्टी असतील असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.लहान मुलंही तिन्ही पक्षांबाबत नाराजी व्यक्त करतीलसध्या राज्य एका बिकट परिस्थितीमधून जात आहे. तिन्ही पक्षांना राज्याच्या हिताच्या संदर्भातले निर्णय घेता येत नाहीत, लहान मुलांना जरी निबंध लिहायला सांगितले तरी ते या तिन्ही पक्षांबाबत नाराजी व्यक्त करतील असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर