शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

चंद्रकांत पाटील बोलले अन् सत्ता गेली तसे हसन मुश्रीफ यांचे व्हायला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:39 IST

उत्तूर : गडहिंग्लजच्या पाणी परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी उचंगी प्रकल्पात पाणीसाठा होईल, असे बोलले. दादा बोलले अन् सत्ता ...

उत्तूर : गडहिंग्लजच्या पाणी परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी उचंगी प्रकल्पात पाणीसाठा होईल, असे बोलले. दादा बोलले अन् सत्ता गेली. तसं ग्रामविकास हसन मुश्रीफ यांचे व्हायला नको, तत्पूर्वी आंबेओहळ धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा, असा इशारा माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी दिला. उत्तूर (ता. आजरा) येथील आंबेओहळ धरणग्रस्तांच्या आयोजित निर्धार परिषदेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, प्रकल्पाचे पाणी पुनर्वसनाशिवाय अडविल्यास धरणग्रस्त खड्डे काढून पाण्यात उभे राहतील. मंत्री झाले म्हणजे धरण झालं असे कोणी समजू नये. धरणग्रस्तांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना क्षमा नाही. खोटा पंचनामा करणाऱ्यांना काय शिक्षा करणार? आंबेओहळ प्रकल्पाची लढाई आता सुरू झाली आहे. पाणी मुश्रीफ यांच्या कारकिर्दीत अडविले जाईल. पण, कधी पुनर्वसन होईल तेव्हा अन्यथा चंद्रकांत पाटील यांच्यासारखी सत्ता जाईल, असे सुतोवाच शिंदेंनी केले. कॉ. संपत देसाई म्हणाले, परिषदेने संघटनेला बळ मिळाले आहे. संघटित राहून पुनर्वसन करून घेऊया. सामूहिक वचन पाळून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रखडलेले प्रश्न सोडवूया. कॉ. अशोक जाधव म्हणाले, मुश्रीफ यांनी घळभरणी करतानाचा कायदा याचा अभ्यास करावा मगच बोलावे. पुनर्वसन अगोदर मग घळभरणी हा कायदा असताना मुश्रीफ यांनी आढावा बैठकीत धरणग्रस्तांची दिशाभूल केली.

धरणात पाणी तुंबेल ते धरणग्रस्तांच्या परवानगीनेच कुणाच्या तरी प्रतिष्ठेसाठी पाणी तुंबवू नका, असा इशाराही कृष्णा खोरेंच्या अधिकाऱ्यांना दिला.

शंकर पावले म्हणाले, २००२-०३ सालच्या टिपण्णीत धरणग्रस्तांसाठी ७०० हेक्टर जमीन होती. या जमिनी कुठे गेल्या यांची चौकशी झाली पाहिजे.

परिषदेत जि. प. सदस्य उमेश आपटे, कॉ. संजय तर्डेकर, संतोष बेलवाडकर, बाळेश नाईक, सुरेश मिटके, सदानंद व्हनबट्टे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गडहिंग्लजचे नगरसेवक उदय कदम, राजू देशपांडे, सागर सरोळकर, अमोल बांबरे आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन कृष्णा-खोरेचे अधिकाऱ्यांना देण्यात आले. -------------------

*

परिषदेच्या मागण्या धरणग्रस्तांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता व पुनर्वसन अधिकारी समवेत व्यापक बैठक घ्या, संकलन दुरुस्ती करा, संपादित जमिनीवरील स्थगिती आदेश उठवा, भूखंड वाटप तातडीने करा, जमिनी वर्ग -१ करून द्या, पॅकेज संदर्भात सक्ती नको, करपेवाडी जमिनीचा प्रश्न तातडीने सोडवा, न्यायालयाच्या निर्णयाचे अवलोकन करा, प्रकल्पग्रस्तांना वाटप झालेल्या जमिनी कसण्यासाठी अडथळे येत आहेत ते दूर करा. -------------------------

फोटो : आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे निर्धार परिषदेत माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. संपत देसाई, कॉ. अशोक जाधव, शंकर पावले, बाळेश नाईक आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.

क्रमांक : १५१२२०२०-गड-०३

दुसऱ्या छायाचित्रात कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देताना श्रीपतराव शिंदे, कॉ. संपत देसाई, अशोक जाधव , उमेश आपटे, शंकर पावले , सदानंद व्हनबट्टे आदी. क्रमांक : १५१२२०२०-गड-०४

-------------------------