शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

चंद्रकांत जाधव हेच ‘उत्तर’ - कॉँग्रेसची रात्री उशिरा झाली अधिकृत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 01:14 IST

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार म्हणून उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे नाव निश्चित झाले. जाधव यांना उमेदवारी मिळाली, ...

ठळक मुद्देयापूर्वी ‘वंचित’कडूनच मुळीक यांच्या कार्यकर्त्यांकडे विचारणा झाली होती. त्यामुळे मुळीक यांनी आता ‘वंचित’ची उमेदवारी घ्यावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार म्हणून उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे नाव निश्चित झाले. जाधव यांना उमेदवारी मिळाली, अशीच चर्चा बुधवारी दुपारनंतर सुरू होती; त्याला अधिकृत दुजोरा बुधवारी रात्री मिळाला. जाधव हे ‘गोशिमा’चे माजी अध्यक्ष असून फौंड्री उद्योजक आहेत. सध्या ते कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष आहेत. मूळचे मंगळवार पेठेतील पाटाकडील तालमीजवळचे राहणारे असून गाजलेले फुटबॉल खेळाडू आहेत.

भाजप-शिवसेना महायुती झाल्यानंतर ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. शिवसेनेने आमदार राजेश क्षीरसागर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. कॉँग्रेसकडून बाजीराव खाडे, दौलत देसाई, सागर चव्हाण यांनी उमेदवारी मागितली होती. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक तर भाजपचे कार्यकर्ते उद्योजक चंद्रकांत जाधव यांनीही कॉँग्रेसकडे उमेदवारी मागितली.

पक्षाचे राष्टÑीय चिटणीस असलेल्या बाजीराव खाडे यांनी थेट प्रियांका गांधी यांच्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे दोन दिवसांपासून त्यांनाच उमेदवारी मिळणार; असे चित्र होते; परंतु या दोन दिवसांत जिल्हा तसेच राज्य पातळीवरील कॉँग्रेस नेत्यांकडून हालचाली झाल्या. विशेषत: जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूर उत्तरमधील वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर चंद्रकांत जाधव यांच्या नावाचा विचार झाला व त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली.वसंतराव मुळीक ‘वंचित’कडे?कॉँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचे कार्यकर्ते वंचित बहुजन महाआघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. परंतु रात्रीपर्यंत तरी हा संपर्क झालेला नव्हता. यापूर्वी ‘वंचित’कडूनच मुळीक यांच्या कार्यकर्त्यांकडे विचारणा झाली होती. त्यामुळे मुळीक यांनी आता ‘वंचित’ची उमेदवारी घ्यावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.राहुल खंजिरेंना  ए/बी फॉर्मचे वाटपकॉँग्रेस कमिटी कार्यालयात बुधवारी इचलकरंजी मतदार संघातील उमेदवार राहुल खंजिरे यांना पक्षातर्फे ए/बी फॉर्म देण्यात आले. देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांच्या हस्ते हा फॉर्म देण्यात आला. यावेळी एस. के. माळी, संजय पोवार, रंगराव देवणे, प्रदीप चव्हाण, महंमद शरिफ शेख, किशोर खानविलकर, संपत पाटील उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक