शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

‘कुंभी’त पुन्हा विजयाचा ‘चंद्रदीप’

By admin | Updated: December 30, 2015 01:11 IST

‘बचाव मंच’चा धुव्वा : नरके पॅनेलची हॅट्ट्रिक, ‘संदीप’चा ‘पतंग’ हवेतच : वीस जागा आठ हजारांच्या फरकाने विजयी

प्रकाश पाटील -कोपार्डे  -संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील ‘नरके पॅनेल’ने विजयाची हॅट्ट्रिक केली. नरके पॅनेलच्या सर्वच्या सर्व २० जागा सरासरी आठ हजारांच्या फरकाने विजयी झाल्या. विरोधी बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखालील ‘कुंभी बचाव मंच’चा अक्षरश: धुव्वा उडाला असून, अपक्ष उमेदवार संदीप अरुण नरके यांची निवडणुकीतील हवा मतपेटीपर्यंत पोहोचली नसल्याने त्यांचा ‘पतंग’ हवेतच राहिला. इतर मागासवर्गीय गटातून सत्तारूढ गटाचे उमेदवार आनंदराव माने हे बिनविरोध म्हणून अगोदरच निवडून आले होते. ‘कुंभी’च्या निवडणुकीत सत्तारूढ ‘नरके पॅनेल’विरोधात ‘राजर्षी शाहू कुंभी बचाव मंच’ने जोरदार आव्हान देण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी पॅनेलची बांधणी करीत बाजीराव खाडे यांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला; पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही. २० जागांसाठी रविवारी २२ हजार ७२७ मतांपैकी १९ हजार ६५४ मतदारांनी (८६ टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता. मंगळवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत १ ते ५३ केंद्रांतील म्हणजेच करवीर तालुक्यातील गट क्रमांक १ ते ३ मधील मतमोजणी करण्यात आली. यामध्ये सुरुवातीपासूनच नरके पॅनेलने मताधिक्य घेत विजयाकडे आगेकूच सुरू ठेवली होती. पहिल्या फेरीचा निकाल तब्बल आठ तासांनी दुपारी चार वाजता जाहीर करण्यात आला. यामध्ये नरके पॅनेलचे सर्वच उमेदवार बचाव मंचच्या उमेदवारांपेक्षा २८०० ते ३५०० च्या मताधिक्याने आघाडीवर राहिले. संदीप नरके यांना ‘करवीर’मधील मतदारांनी साथ दिल्याने ते नरके पॅनेलच्या गट क्रमांक पाच मधील उमेदवार प्रकाश दौलू पाटील यांच्यापेक्षा केवळ १८०० मतांनी पिछाडीवर होते. त्यामुळे संदीप नरके हे उर्वरित पन्हाळा तालुक्यातील मतमोजणीत मुसंडी मारतील, असे आडाखे बांधले जात होते; पण पन्हाळ्यातील मतदारांनी आमदार नरके यांची पाठराखण करीत संदीप नरके यांना नाकारले. बचाव मंचचे नेते बाजीराव खाडे हे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे खंदे समर्थक; तर ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांचे ते भाऊ आहेत. त्यांनी विरोधी पॅनेलमध्ये सर्वाधिक ५१४१ मते घेतली. दुसऱ्या फेरीत केंद्र क्रमांक ५४ ते १०५ म्हणजेच पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी व करवीर या तालुक्यांतील दहा गावांतील मतमोजणी करण्यात आली. यामध्ये नरके पॅनेलच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत मताधिक्यात उच्चांक गाठला. सायंकाळी सात वाजता पहिल्या गटातील निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये नरके पॅनेलचे उमेदवार अनिल पाटील यांनी १३,३९२, गट क्रमांक दोनमध्ये उत्तम वरुटे यांना १३,४८७, गट क्रमांक तीनमध्ये प्रकाश कुंडलिक पाटील यांना १३,४८१, गट क्रमांक चारमध्ये जयसिंग यशवंत पाटील यांना १३,१६३, तर गट क्रमांक पाचमध्ये आमदार चंद्रदीप नरके यांनी १३,०४८ अशी सर्वाधिक मते घेतली. महिला गटात अनिता पाटील यांना १३,०४२ व माधुरी पाटील यांना १३,०४० मते पडली. त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी कविता पाटील यांच्यावर मोठे मताधिक्य घेऊन बाजी मारली. अनुसूचित जाती गटात यल्लाप्पा कांबळे यांना १२,८५९ मते मिळाली तर भटक्या-विमुक्त गटात दिलीप गोसावी यांनी १३,७४० मते घेऊन विजय मिळविला. पहिल्या गटातील निकाल जाहीर होताच नरके पॅनेलच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. पॅनेलचे प्रमुख आमदार चंद्रदीप नरके रात्री १० वाजता मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करून त्यांना उचलून घेऊन विजयोत्सव साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक अधिकारी योगेश खरमाटे व प्रदीप मालगावे यांनी मतमोजणीचे नेटके नियोजन केले होते. गेले पंचवार्षिक निवडणुकीतील मतमोजणी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरू होती; पण संजय पवार यांनी मतमोजणीचे केलेल्या नियोजनामुळे रात्री दहापर्यंत सर्वच गटांचे निकाल जाहीर करण्यात आल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांमधून निवडणूक यंत्रणेचे कौतुक करण्यात आले. अवैध मतांचा टक्का वाढला!पहिल्या फेरीत अनुसूचित जाती / जमाती गटात १६१२ मते अवैध ठरली. या गटात सात उमेदवार असल्याने मतदार काहीसे गोंधळून गेल्याचे दिसले. महिला गटाच्या मतपत्रिकेनंतर ही मतपत्रिका असल्याने मतदारांनी या गटातही दोन शिक्के मारल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात मते अवैध ठरली. क्रॉस व्होटिंगमुळे ६०० पासून २८५४ पर्यंत मते अवैध ठरल्याचे स्पष्ट झाले. संदीप नरके, बाजीराव खाडे शेवटपर्यंत तळ ठोकूनपहिल्या फेरीतच निकालाचा कल लक्षात आला होता. नरके पॅनेलच्या उमेदवारांची विजयाकडे घोडदौड होती; पण मतमोजणी केंद्रात संदीप नरके व बाजीराव खाडे शेवटपर्यंत तळ ठोकून होते. संदीप यांच्याविषयी उत्सुकता निवडणूक एकतर्फी असल्याने निकाल काय लागणार हे माहीत होते; पण संदीप नरके हे मुसंडी मारतील, असे चित्र होते. त्यामुळे मतमोजणीस सुरुवात झाल्यापासून ‘संदीप नरकेंचे काय झाले?’ एवढीच विचारणा अनेकांकडून होत होती.