शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एका सहीच्या प्रमाणपत्राचा निर्णय कुलगुरुंचा; मंगळवारपासून आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:38 IST

एका सहीचे पदवीप्रमाणपत्र छपाईचा निर्णय कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचा आहे. त्यांनी त्याबाबत प्रशासनाला तोंडी आदेश दिले. त्यांनी बेकायदेशीर, आर्थिक गैरव्यवहार केला

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचा आरोप

कोल्हापूर : एका सहीचे पदवीप्रमाणपत्र छपाईचा निर्णय कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचा आहे. त्यांनी त्याबाबत प्रशासनाला तोंडी आदेश दिले. त्यांनी बेकायदेशीर, आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केला आहे. डॉ. शिंदे यांना कुलगुरु पदावरुन हटविण्याच्या मागणीसाठी मंगळवार (दि. १६) पासून  आंदोलन सुरु केले जाणार असल्याची माहिती सुटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण पाटील, सहकार्यवाह सुभाष जाधव आणि सल्लागार सुधाकर मानकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

अरुण पाटील म्हणाले,  प्रशासकीय गैरव्यवहारांबाबतच्या कारवाईस दिरंगाई कुलगुरुंकडून होत आहे. त्यांचे प्रमाद वाढत आहे. त्यामुळे त्यांना पदावरुन हटविण्याच्या मागणीसाठी सुटाने पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सुभाष जाधव म्हणाले, विद्यापीठ हित बाजूला ठेऊन कुलगुरुंचे काम सुरु आहे. त्यांच्या तोंडी आदेशानुसार एका सहीची पदवीप्रमाणपत्रांची छपाई करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाला आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यांच्या कामकाजाविरोधातील आंदोलन टप्प्याटप्याने तीव्र केले जाईल.

सुधाकर मानकर म्हणाले, प्रमाणपत्र दुबार छपाई प्रकरणाबाबतच्या चौकशी समितीचा अहवाल चुकीचा आहे. या अहवालाची सुटाने मागणी केली आहे. तो मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. या पत्रकार परिषदेस डी. एन. पाटील, आर. जी. कोरबू, प्रकाश कुंभार, आदी उपस्थित होते.  चुकीचे आरोप, विद्यापीठाची बदनामीदरम्यान, याबाबत कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले,  सुटा संघटनेने जे आरोप केले आहेत ते चुकीचे आणि खेदजनक आहेत. सर्व घटकांना बरोबर घेऊन विद्यापीठ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशावेळी विद्यापीठाची बदनामी करण्याचे काम सुटाकडून सुरु आहे. प्रमाणपत्र दुबार छपाई प्रकरणाबाबत विद्यापीठ प्रशासनाची कार्यवाही सुरु आहे. 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर