शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उन्हापासून कोल्हापूरकरांना थोडा दिलासा मिळणार, तीन दिवस मध्यम थंडीची शक्यता

By संदीप आडनाईक | Updated: February 19, 2024 16:05 IST

कोल्हापूर : राज्यातून कायमची थंडी गायब होण्याची शक्यता असताना, सरासरीपेक्षा काहीशी अधिक तापमानाची , तसेच चढ-उतारासहित अल्पशी का होईना, ...

कोल्हापूर : राज्यातून कायमची थंडी गायब होण्याची शक्यता असताना, सरासरीपेक्षा काहीशी अधिक तापमानाची, तसेच चढ-उतारासहित अल्पशी का होईना, पण शेतपिके व फळबागांना लाभदायक ठरू पाहणारी हिवाळ्यातील थंडी फेब्रुवारी अखेरपर्यंतची आपला हंगामी कार्यकाळ पूर्ण करणार अशी शक्यता आहे. दि.२१ ते २३ फेब्रुवारी (बुधवार ते शुक्रवार) पर्यंतच्या तीन दिवसांत पुन्हा मध्यम थंडीची शक्यता वाढली आहे.उत्तर भारतात एकापाठोपाठ, कमी दिवसांच्या अंतराने, मार्गक्रमण करणाऱ्या, तीव्र पश्चिम झंजावातांची साखळी सतत टिकून राहिल्यामुळे, हे घडत आहे. उत्तर भारतात धुक्याचे प्रमाणही आता कमी होऊन दृश्यमानताही तेथे सुधारली आहे. संपूर्ण उत्तर भारतात रविवारपासून पुढील ५ दिवस म्हणजे, २२ फेब्रुवारीपर्यंत पश्चिमी झंजावात आणि त्याचबरोबर मध्य-भारत स्थित ' प्रत्यावर्ती वारा पॅटर्न'च्या बदलातून तेथे पुन्हा जोरदार पाऊस, जबरदस्त बर्फवृष्टी आणि गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच संपूर्ण उत्तर भारत ते महाराष्ट्रातील खानदेशातील अक्षवृत्तपर्यंत, समुद्रसपाटीपासून साडेबारा किमी उंचीवर, पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २७० किमी अतिवेगवान प्रवाही झोताचे 'पश्चिमी' वाऱ्यांचे वहन अजूनही टिकून आहे. कर्नाटक किनारपट्टी ते खान्देशपर्यंत समुद्रसपाटीपासून साधारण १ किमी उंचीपर्यंत पसरलेला हवेच्या कमी दाबाचा असा ह्या सर्वांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा खडीत स्रोत टिकून आहे. यामुळे महाराष्ट्रात मुंबईसह कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या १७ जिल्ह्यांत उत्तरेकडून घुसणाऱ्या थंड वाऱ्यांच्या शक्यतेमुळे, पहाटेच्या किमान तापमानात घट होऊन, दि. २१ ते २३ फेब्रुवारी (बुधवार ते शुक्रवार) पर्यंतच्या तीन दिवसात पुन्हा मध्यम थंडीची शक्यता वाढली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTemperatureतापमान