शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ताकद दाखविण्याचे आव्हान

By admin | Updated: October 2, 2014 00:38 IST

मतदारांसमोर अनेक पर्याय : सात प्रमुख राजकीय पक्षांचा सहभाग

भारत चव्हाण - कोल्हापूरÈ विधानसभा निवडणुकीत वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी तुटेपर्यंत ताणून धरल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गणिते बदलली असून, त्याचा परिणाम कोल्हापूर उत्तर मतदारसंघावरही उमटला. आघाडी, युती करून लढणारे आणि एकमेकांवर डरकाळ्या फोडणारे सगळेच राजकीय पक्ष स्वतंत्र लढत असल्याने उमेदवारांच्या तोंडाला चांगलाच फेस येणार आहे. कर्तृत्व, पैशांबरोबरच उमेदवारांचे ‘नशीब’ फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार आहे. मतदान यंत्रे उघडेपर्यंत अमूक एक उमेदवार निवडून येईल, याचे भाकित वर्तवणे केवळ अशक्य आहे. कोणीही कितीही मतांची आकडेमोड केली, तसेच मतदारांची विभागणी करून बेरजा केल्या तरीही ‘उत्तर’ कोणाला कळेल, हे सांगता येणे महाकठीण आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, भाकप, शेकाप असे तब्बल सात पक्ष आपली ताकद अजमावण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत. शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांत विविध आंदोलनांच्या माध्यमातून शहराशी दररोजचा संपर्क ठेवला आहे. टोल, एलबीटीचा प्रश्न असो की, शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असोत, क्षीरसागर यांनी प्रत्येक आंदोलनात हिरीरीने भाग घेतला. परंतु, त्यांच्यासमोर पक्षांतर्गत कुरघोडीची समस्या गंभीर असून, त्यांचा सामना करावाच लागेल. भाजपच्या हुकमी मतांवरही गंडांतर आल्याने त्याचा मोठा फटका त्यांना बसणार आहे. कॉँग्रेसच्या सत्यजित कदम यांनी पहिल्या दणक्यात उमेदवारी मिळविली. राजकारणासाठी आवश्यक असणारे सर्व गुण त्यांच्याजवळ आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांनी जोरदार तयारी केली आहे. टोलच्या आंदोलनातून जनतेत मिसळण्याचा प्रयत्न केला. त्यांना काही खडतर अडथळे पार करावे लागतील. त्यांचे नातेवाईक असलेले अमल महाडिक ‘दक्षिण’मधून सतेज पाटील यांच्या विरोधात लढत आहेत. त्याचा फटका कदमांना बसणार हे नक्की! राष्ट्रवादीचे आर. के. पोवार फेरीवाल्यांचे प्रश्न, टोल आंदोलन याद्वारे ते जनतेत आहेत. केव्हाही कुठेही भेटणे हा त्यांचा स्वभाव आहे. परंतु, त्यांच्याही पक्षात संभाजी देवणे यांनी बंडखोरी केली आहे. पोवार यांना हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक यांची किती, कशी मदत होते यावर भवितव्य आहे. ‘मनसे’ची शहरात फारशी ताकद नसली तरी पक्षाला सुरेश साळोखे यांच्या उमेदवारीचा फायदा होणार आहे. भाजपची पंधरा ते अठरा हजार मते असली तरी महेश जाधव यांना आणखी मतांसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. आंदोलनाला सर्वांत पुढे असणाऱ्या डाव्या पक्षांना मदत करायला मात्र जनता नेहमी मागे राहिली. त्यामुळे रघुनाथ कांबळे (भाकप), मनीष महागावकर (शेकाप) हे किती मतदान घेतात, हाच उत्सुकतेचा विषय होईल. एकंदरीत सर्व उमेदवार व त्यांच्या पक्षांच्या ताकदीचा विचार करता कोण किती पाण्यात आहे, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. (अपक्ष उमेदवार : कविराज ऊर्फ साहेबराव काशीद, अनिल ढेरे, महंमदगौस मुल्ला, अमित पावळे, मुश्ताक मुल्ला, रामचंद्र कांबळे.)नावउत्तर कोल्हापूर एकूण मतदार २,८0,७६६पक्षराजेश क्षीरसागर शिवसेनासत्यजित कदम काँग्रेसमहेश जाधव भाजपरघुनाथ कांबळे भाकपआर. के. पोवार राष्ट्रवादीश्रीकांत कुंडाप्पाबसपसुरेश साळोखे मनसेजगन्नाथ दाभोळे मविआमनीष महागावकर शेकापअरविंद माने अपक्षउदय लाड अपक्षसंभाजी देवणे अपक्ष