शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कौशल्यपूर्ण मनुष्यबळ घडविण्याचे आव्हान

By admin | Updated: February 3, 2017 00:44 IST

प्रतापसिंह देसाई : तंत्रशिक्षणात समान अभ्यासक्रमासाठी पाठपुरावा

‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था’ (आयएसटीई) ही तंत्रशिक्षण क्षेत्रातील सभासदसंख्येवर आधारित जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. या संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राला तीन वर्षे पूर्णवेळ अध्यक्षाची संधी कोल्हापूरचे प्रतापसिंह देसाई यांच्या माध्यमातून मिळाली. देसाई यांच्याद्वारे कोल्हापूरचा तंत्रशिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला आहे. अध्यक्षपदाची दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या देसाई यांच्याशी ‘आयएसटीई’ची सुरुवात, कामकाज, भविष्यातील उपक्रम, तंत्रशिक्षणाची अवस्था, आव्हाने आदींबाबत साधलेला हा थेट संवाद.प्रश्न : ‘आयएसटीई’ची सुरुवात कशी झाली?उत्तर : सन १९४१ मध्ये ‘आयएसटीई’ची सुरुवात झाली. प्रारंभी ही संस्था देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची संस्था म्हणून कार्यरत होती. सन १९६८ मध्ये इंडियन सोसायटी अ‍ॅक्टनुसार ही संस्था नोंदणीकृत झाली. अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, एमबीए, एमसीए या अभ्यासक्रमांच्या नियमनाचे काम या संस्थेद्वारे करण्यात येत होते. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागाची सल्लागार म्हणून संस्था कार्यरत होती. सन १९९३ मध्ये सरकारने अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालयाची (एआयसीटी) सुरुवात केली. त्यानंतर ‘आयएसटीई’च्या कामकाजाचे स्वरूप बदलले. सरकारचे तंत्रशिक्षण विषयक प्रकल्प राबविण्याचे काम संस्था करू लागली. अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतनचे १ लाख ४२ हजार प्राध्यापक आणि ८ लाख ५० हजार विद्यार्थी या संस्थेचे सभासद आहेत. देशातील ४७०० पैकी ३५०० अभियांत्रिकी महाविद्यालय आणि ३२०० तंत्रनिकेतनसह आयआयटी, एनआयटीई या संस्था सभासद आहेत. तंत्रशिक्षणातील विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थांचा सर्वांगीण विकास साधणे, त्यासाठी विविध उपक्रम राबविणे हे आयएसटीईचे उद्दिष्ट आहे. देशभरातील शाखांतून संस्थेवर ७२ प्रतिनिधी निवडून येतात. ते आपल्यातून अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करतात. संस्थेच्या स्थापनेनंतर सन १९९९ ते २००० या कालावधीत महाराष्ट्राला अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच तीन वर्षांच्या पूर्ण कालावधीसाठी महाराष्ट्रातून मला अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.प्रश्न : तंत्रशिक्षणासमोर कोणते आव्हान आहे?उत्तर : तंत्रशिक्षण क्षेत्रात अस्थिर वातावरण आहे. आपला देश वर्षाला १६ लाख अभियंते, तर उर्वरित जग सुमारे १२ लाख अभियंते निर्माण करते. मात्र, आज अशी स्थिती आहे की, अभियंते घडत आहेत, वर्षागणिक त्यांची संख्या वाढत आहे, पण कामाला योग्य असणारी आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळत नसल्याचे वास्तव आहे. कौशल्यपूर्ण मनुष्यबळ घडविण्याचे आव्हान तंत्रशिक्षणासमोर आहे. त्यासह या क्षेत्रातील गुणवत्ता, दर्जा वाढविण्याची गरज आहे. जगाला सन २०२५ पर्यंत १२० कोटी अभियांत्रिकी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ लागणार आहे. हे मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आपल्या देशाकडे आहे. प्रश्न : प्राध्यापकांसाठी संस्था काय करते?उत्तर : प्राध्यापक दर्जेदार असतील, तर विद्यार्थी दर्जेदार घडतील. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात प्राध्यापक होण्यासाठी फारशी मोठी पात्रता असण्याची अट नाही. बी. ई., एम. ई. झाले की, प्राध्यापक म्हणून काम करता येते. या क्षेत्रात पाच टक्के लोक शिक्षक म्हणून करिअरची निवड करतात. त्याचा विपरीत परिणाम एकूणच या क्षेत्रातील अध्यापनावर होत आहे. तंत्रज्ञान हे नेहमी बदलत असते. त्यामुळे अभियंते घडविणाऱ्या प्राध्यापकांना अद्ययावत ठेवण्यासाठी आयएसटीई प्रशिक्षण देते. यासाठी नॅसकॉम, एआयसीटीसह जगातील तंत्रज्ञांची मदत घेतली जाते. क्लाऊड कॉम्प्युटिंग, डाटा अ‍ॅनेलेसिस आदींबाबत त्यांना मार्गदर्शन केले जाते. यासाठी संस्थेची प्रत्येक राज्य, जिल्ह्यात एकूण २८०० केंद्रे कार्यरत आहेत.प्रश्न : विद्यार्थ्यांकरिता कोणते उपक्रम राबविले जातात?उत्तर : स्टुडंटस् पार्टिस्पिकेशन इंजिनिअरिंग एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट (स्पीड) या संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. त्यात आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांशी संवाद, गटचर्चा, काही स्पर्धा घेतल्या जातात. त्यातून विद्यार्थ्यांची विषय सादरीकरणाची क्षमता वाढते. ज्ञानाची देवाण-घेवाण, सामूहिकपणे काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ‘जीएसएफ’या परिषदेसाठी दरवर्षी १० विद्यार्थ्यांना पाठविले जाते. यावर्षी संबंधित परिषद मलेशियाला होणार आहे. राज्यपातळीवर संस्था दरवर्षी विद्यार्थी कौशल्य विकासासाठीचे विविध स्वरूपांतील ७० उपक्रम राबविते. समस्येचे गणितीकरण केल्याशिवाय संशोधन आणि शोध होणार नाही. ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना विविध पद्धतीने विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा राबविली जात आहे. प्रश्न : गुणवत्तावाढीसाठी संस्था काय करणार आहे?उत्तर : सध्याची अभ्यासक्रमाबाबतची विद्यापीठ पातळीवरील पद्धती तंत्रशिक्षणाला अडचणीची ठरत आहे. गरजेप्रमाणे अभ्यासक्रम बदलला पाहिजे. त्यादृष्टीने सरकार, विद्यापीठ आणि एआयसीटीच्या एकत्रिकरणातून समान अभ्यासक्रम करणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ‘नीट’च्या धर्तीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने आयएसटीईद्वारे प्रयत्न सुरू आहेत. गुणवत्तेबाबत संस्था पातळीवरील निकष अधिक काटेकोर केले पाहिजेत. अभियंता हा एकप्रकारे रोजगार निर्माता असतो. त्यामुळे शासनाच्या मदतीने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात येईल. कॉम्प्युटर शाखेकडील विद्यार्थ्यांचा कल गेल्या दोन-अडीच वर्षांपासून पुन्हा वाढला आहे. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतनमधील गुणवत्ता वाढीसाठी तंत्रशिक्षणाचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत सरकारकडे आयएसटीईचा पाठपुरावा सुरू आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरात अग्रस्थानी असलेल्या काही उद्योगांशी संस्थेने सामंजस्य करार केला आहे. त्याचा उपयोग कौशल्य विकास उपक्रम राबविण्यासाठी केला जाईल. विद्यार्थी, शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या विकासासाठी योजना राबविण्याचा मानस आहे. - संतोष मिठारी