शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कुरुंदवाड पालिकेत रंगतोय खुर्चीचा खेळ

By admin | Updated: July 18, 2014 00:51 IST

६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष : विकासापेक्षा खुर्चीचे राजकारण

गणपती कोळी - कुरुंदवाडयेथील पालिकेतील नेत्यांचे टोकाचे राजकारण, दल बदलू नगरसेवक, प्रत्येकवेळी त्रिशंकू परिस्थिती, आदी कारणांमुळे या पालिकेला गेल्या ६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष लाभले आहेत. ना. बा. गायकवाड, रावसाहेब पाटील, जयराम पाटील वगळता कोणत्याही नगराध्यक्षाला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आलेला नाही. खुर्चीसाठी राजकारण या धोरणामुळे शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही.शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड हे निमशहर आहे. २५ हजार लोकवस्ती असलेली ‘क’ दर्जाची नगरपालिका आहे. मात्र, येथील राजकीय नेत्यांची महत्त्वाकांक्षा, ईर्षा आणि सत्तेसाठी वाट्टेल ते अशा भूमिकेमुळे पालिका ‘क’ दर्जाची असली, तरी राजकारण मात्र ‘अ’ दर्जाचेच राहिले आहे. येथील राजकारण अनेकवेळा जिल्हा नव्हे, तर मुंबईच्या नेत्यांचीही डोकेदुखी ठरली आहे.संस्थानकालीन असलेल्या शहरात १९५१ ला नगरपालिका अस्तित्वात आली. मात्र, नेत्यांचे टोकाचे व सोयीचे राजकारण, सत्तेसाठी दल बदलू नगरसेवक व पालिकेत त्रिशंकू परिस्थिती यामुळे पालिकेला ६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष लाभले आहेत. त्यापैकी २० वेळा प्रशासक व तहसीलदार यांना कार्यभार सांभाळावा लागला आहे. पहिले नगराध्यक्ष ना. बा. गायकवाड, रावसाहेब पाटील, जयराम पाटील वगळता कोणत्याही नगराध्यक्षांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आलेला नाही, तर शं. रा. शिंदे, बाबासाहेब देसाई, भा. चि. निटवे यांच्याव्यतिरिक्त इतर नगराध्यक्षांना फार काळ खुर्ची टिकविता आली नाही.शहरात रावसाहेब पाटील, रामचंद्र डांगे व जयराम पाटील हे तीन प्रमुख राजकीय गट असून, प्रत्येक गट आपआपल्या प्रभागात अस्तित्व राखून आहे. त्यामुळे पालिकेच्या बहुतेक निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते. निवडणुकीनंतर नेत्यांबरोबर नगरसेवकही सोयीचे राजकारण करीत असल्याने पालिकेला वारंवार राजकीय भूकंप बसत असतो. शिवाय अलीकडच्या काळात सत्तेतील सर्वांना पदाची संधी यामुळे नगराध्यक्षपदाची यादी वाढतच आहे. परिणामी, अल्प कालावधी, वारंवार राजकीय सत्तांतर यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसत आहे.अशी मिळाली संधी-ाालिकेच्या इतिहासात आ. कृ. माने, जयराम पाटील, कविता जोंग यांना दोनवेळा नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. -जयराम पाटील १९८५ ते १९९१ व २००१ ते २००६ असे दोनवेळा एकूण ११ वर्षे नगराध्यक्ष पदावर राहणारे एकमेव नगराध्यक्ष ठरले आहेत.