शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेस वसुली होणारच : समिती पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:26 IST

कोल्हापूर : सेस आकारणी ही बाजार समिती आपल्या मर्जीने करीत नाही. शासनानेच ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी म्हणून वसुली करण्याचे ...

ठळक मुद्देसेस वसुली होणारच : समिती पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सुनावलेबाजार समितीची १६वी वार्षिक सर्वसाधारण सभा

कोल्हापूर : सेस आकारणी ही बाजार समिती आपल्या मर्जीने करीत नाही. शासनानेच ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी म्हणून वसुली करण्याचे काम करते. ते नको असेल तर खुशाल सरकारकडे जाऊन नियम बदलून आणा, अशा शब्दांत बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सुनावले. धान्य बाजार स्थलांतरणावरूनही संचालकांनी व्यापाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. ‘एक पाय टाकलाच आहे, आता उरलेला पायही आत टाका, स्वागतासाठी समिती सज्ज आहे,’ असा चिमटाही काढला.शुक्रवारी दुपारी मल्टिपर्पज सभागृहात सभापती बाबासो लाड यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची १६वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. पुढील वर्षी जुलैमध्ये निवडणुका होणार असल्याने नियमानुसार ही शेवटचीच सभा ठरत असल्याने सभेत कारभारावर झोड उठण्याऐवजी विद्यमान संचालकांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव झाला.सचिव मोहन सालपे यांनी अहवालाचे वाचन केल्यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. माजी संचालक नयन प्रसादे यांच्यासह प्रदीप कापडिया, अशोक आहुजा यांनी व्यापाऱ्यांना सेसमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी केली. यावर सभापती लाड, माजी सभापती कृष्णात पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला.दरम्यान, सभेत बोलण्यावरून शासननियुक्त संचालक अ‍ॅड. किरण पाटील व विलास साठे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. संचालक म्हणून बोलता येत नाही, तशी परवानगी देऊ नये असे नंदकुमार वळंजू यांनी सांगितले.

पाटील यांनीही बोलता येत नसेल तर मी राजीनामाच देतो, असा इशारा दिल्यानंतर त्यांना बोलू दिले गेले; पण त्यांनी कोणताही विषय न मांडता केवळ जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर