शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

केंद्राचा उद्योगांविषयीचा नवा आराखडा घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 7:51 PM

विकास प्रकल्पांना होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन, केंद्र शासनाने पर्यावरण आघात अहवालासंदर्भातील अनेक नियम व अटी शिथिल करण्याचे धोरण आखले आहे. यामुळे कोणत्याही प्रकल्पांना सहजपणे मंजुरी देता येईल, असे शासनाला वाटते. या पर्यावरणविरोधी धोरणास जनतेने विरोध करणे अत्यावश्यक आहे. - डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर

ठळक मुद्देस्थानिकांनाच हरकत घेण्याचा अधिकार; तेरा हजारांहून अधिक पर्यावरणप्रेमींकडून आक्षेप

संदीप आडनाईक ।कोल्हापूर : पर्यावरणावर उद्योगांच्या होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तयार केलेला नवीन आराखडा जर मंजूर झाला तर देशातील पर्यावरण धोक्यात येणार आहे. विशेषत: ज्या त्या परिसरातील व्यक्तीलाच हरकत घेण्याची तरतूद करण्यामागे पर्यावरणाला हानी पोहोचविण्याºया उद्योगांच्या बाजूच्या असणाऱ्यांचा कावा आहे आणि तो अतिशय घातक आहे, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. तेरा हजारांहून अधिक पर्यावरणप्रेमींनी ई-मेल पाठवून आक्षेप नोंदविला आहे.

पर्यावरणावर उद्योगांच्या होणाºया परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ईआयए २०२० (एनव्हायर्न्मेंट इम्पॅक्ट असेसमेंट) नवा आराखडा २३ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध केला आहे. सुरुवातीला याविषयी मत मांडण्यासाठी १० मेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, संचारबंदीच्या काळातच असा निर्णय घेण्याला अनेकांनी विरोध केल्याने आता ही मुदत ३० जूनअखेर वाढविली आहे. देश कोरोनाशी लढा देण्याच्या मन:स्थितीत असतानाच कावेबाजपणे कोणताही प्रकल्प विनासायास आणि त्यांच्या इच्छेनुसार मंजूर व्हावा, यासाठी अशा प्रकारचा नवा आराखडा मंजूर करण्याचा डाव आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

पर्यावरण आणि वन्यजीव, तसेच जैवविविधता संरक्षण-संवर्धन नियम व कायद्यानुसार देशात कोणताही औद्योगिक प्रकल्प उभारणीच्या वेळी शासनाची रितसर मंजुरी घेण्यापूर्वी प्रकल्पस्थळावर असणाºया जैवविविधतेच्या अभ्यास अहवालासहित पर्यावरण आघात अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.

देशभरातून तेरा हजारांहून अधिक आक्षेपया नव्या अधिसूचनेला विरोध करण्यासाठी देशभरातून तेरा हजारांहून अधिक पर्यावरणप्रेमींनी आतापर्यंत पर्यावरण मंत्रालयाला ई-मेल पाठवून आक्षेप नोंदविला आहे. तसेच हरकती नोंदविण्यासाठी नियमानुसार किमान ९० दिवसांचा कालावधी जाहीर करण्याची मागणीही केली आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीCentral Governmentकेंद्र सरकारgovernment schemeसरकारी योजना