शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक रेशनिंगची केंद्राकडून दखल; कोल्हापूरची ‘अन्नसुरक्षा’ मूल्यमापनासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:31 IST

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘बायोमेट्रिक रेशनिंग’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये राज्यात कायम पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागाची आता केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. राष्टÑीय अन्नसुरक्षा कायदा अंमलबजावणीच्या मूल्यमापनासाठी कोल्हापूर जिल्ह्णाची निवड करण्यात आली आहे. या धर्तीवर नुकतीच केंद्रीय पथकाने जिल्ह्णात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे.बायोमेट्रिक ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘बायोमेट्रिक रेशनिंग’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये राज्यात कायम पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागाची आता केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. राष्टÑीय अन्नसुरक्षा कायदा अंमलबजावणीच्या मूल्यमापनासाठी कोल्हापूर जिल्ह्णाची निवड करण्यात आली आहे. या धर्तीवर नुकतीच केंद्रीय पथकाने जिल्ह्णात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे.बायोमेट्रिक रेशनिंगसह सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये आदर्श जिल्हा म्हणून कोल्हापूरने राज्यात आघाडी घेतली आहे. येथील कामकाजाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या सनियंत्रण व समवर्ती मूल्यमापन समितीचे प्रमुख उपेंद्रसिंग यांच्या नेतृत्वाखालील तीनसदस्यीय पथकाने राज्य सरकारच्या सूचनेनुसार नुकतीच भेट दिली. यामध्ये या समितीने जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसील कार्यालय, धान्य गोदाम, रेशन दुकाने व रेशन कार्डधारकांच्या घरी अचानक भेटी देऊन कार्यप्रणालीची पाहणी केली. विशेषत: संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्ह्णाने बायोमेट्रिक रेशनिंगमध्ये प्रथम क्रमांकावर घेतलेल्या मोठ्या आघाडीच्या अनुषंगाने तसेच एकंदर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याची साठवणूक व वाहतूक व्यवस्था, अन्नधान्याचे उचल-वाटप, ‘अन्न दिन’सारखे जिल्ह्णात प्रभावीपणे राबविले जात असलेले उपक्रम, केरोसीनमुक्त शहर व गावे संकल्पना, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण यांबाबतची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून विस्ताराने जाणून घेतली. यानंतर क्षेत्रीय पातळीवर कोल्हापूर शहर, करवीर तालुका, आजरा शहर व ग्रामीण अशा काही निवडक ठिकाणी काही गावांना व रेशन दुकानांना भेटी देऊन प्रत्यक्ष रेशन कार्डधारकांशी संवाद साधला. हे पथक येथील कामकाजाबाबत केलेल्या पाहणीचा अहवाल केंद्र सरकारला देणार असून, काही सूचनाही करणार असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूरनंतर जळगाव, वाशिम, जालना या जिल्ह्यांत जाऊन ही समिती पाहणी करणार आहे.‘बायोमेट्रिक’वर धान्यवाटपातील आघाडी कायममे महिन्यात निव्वळ आधार पडताळणीद्वारे ९० टक्क्यांहून अधिक रेशनकार्डांवर धान्य वाटप करून कोल्हापूर जिल्ह्णाने आपली आघाडी राज्यात मोठ्या फरकाने कायम ठेवली आहे. चालू जून महिन्यामध्ये तर पहिल्या दहा दिवसांतच ७० टक्क्यांहून अधिक धान्य वाटप केले आहे.