शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्डाचे काम आता आॅनलाईन

By admin | Updated: October 9, 2015 01:12 IST

अरूण नलावडे : महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाची सभा

रत्नागिरी : नाटक लिहिल्यानंतर रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाकडे तपासणी व मान्यतेसाठी पाठवले जाते. परिनिरीक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन लेखकाचा येण्या-जाण्याचा खर्च वाचावा व कोणाचीही अडवणूक होऊ नये याकरिता लवकरच महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाचे कामकाज आता आॅनलाईन सुरु करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी सांगितले.महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाची मासिक सभा बुधवारी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती. सभेनंतर जिल्ह्यातील रंगकर्मी, नाट्यसंस्था, लेखक, दिग्दर्शक, माध्यमांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नलावडे बोलत होते. यावेळी भद्रकाली प्रॉडक्शन व ‘समुद्र’चे निर्माता प्रसाद कांबळी, ज्येष्ठ रंगकर्मी व लेखक, दिग्दर्शक अशोक समेळ उपस्थित होते.परिनिरीक्षक मंडळाकडे नाटकाची संहिता पाठवल्यानंतर ती दोन सदस्यांकडे वाचण्यासाठी दिली जाते. त्यानंतर मंडळाच्या बैठकीमध्ये सदस्य संहितेबद्दलचे आक्षेप नोंदवतात. त्यानंतर त्यावर चर्चा केली जाते. नंतर लेखकाला याबद्दल कळवले जाते. शिवाय संहितेबद्दल लेखकाला काही सांगायचे असेल तर त्यासाठी बोलावलेदेखील जाते. एकूणच खेळीमेळीच्या वातावरणात व चर्चेतून मार्ग काढला जातो अशी मंडळाच्या कामाची पद्धत नलावडे यांनी स्पष्ट केली. नवनवीन नाटके यावीत यासाठी मंडळ प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.नाटकाची संहिता परिनिरीक्षणासाठी पाठवल्यानंतर सहा महिने का लागतात? यावर नलावडे यांनी सांगितले की, मंडळ कोणाचीही अडवणूक होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. नाटक लिहिल्यानंतर लेखकाने तातडीने सेन्सॉर करुन घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच ते प्रयोगासाठी पाठवावे. एकांकिका किंवा नाट्य महोत्सवासाठी तातडीने संहिता द्यायची असेल तर तसे कळवावे. महिन्याभरात ते सेन्सॉर करुन पाठवले जाईल, असे सांगितले. जुने नाटक सादर करणाऱ्या संस्थेला नाटक सादर करण्यासाठी सेन्सॉरची परवानगी घ्यावीच लागेल.प्रत्यक्ष संहितेमध्ये लेखक वेगळे लिहितो. परंतु, कलाकारांकडून काही वेळा आक्षेपार्ह सादर केले जाते. काहीवेळा अश्लिल संवादही होत असतात. त्यावेळी लेखकाने किंवा निर्मात्याने नाटक सादर करत असतानाच नियम घालणे गरजेचे आहे. जेणेकरुन पाच ते १२ वर्षाखालील मुलांना नाटकाला प्रवेश नाकारले जाऊ नये. सेन्सॉर बोर्ड लेखकावर बंधन टाकू शकते कलाकारावर नाही.संगीत नाटकांसाठी साडेतीन तासांपेक्षा कमी कालावधी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचलनालय नियम घालू पाहत आहे. यासाठी मंडळाला संस्थांनी पत्र पाठवून विनंती करावी. परंतु, जर नियम स्पर्धेसाठी लागू केला असेल तर कमी वेळेत नाटक सादरीकरण हे दिग्दर्शकाचे कौशल्य असेल असे विवेक आपटे म्हणाले. स्पर्धांसाठी येणाऱ्या संहिता मंडळाकडे येण्याचा ओघ वाढला आहे. अधिकाधिक लोकांकडे वाचायला देऊन प्रमाणपत्र देण्यासाठी सेन्सॉर बोर्ड प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी अ‍ॅड. संजय देशपांडे, माधव टिकेकर, दाक्षायणी बोपर्डीकर व अन्य सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)रत्नागिरीत प्रथमच झाली परिनिरीक्षक मंडळाची बैठक.नाट्यलेखकांचा येण्या - जाण्याचा खर्च वाचणार.नवनवीन नाटके येण्यासाठी मंडळ प्रयत्नशील.जुने नाटक सादरीकरणासाठी सेन्सॉरची परवानगी आवश्यक.स्पर्धांसाठी येणाऱ्या संहितांचा ओघ वाढला.