शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आदिनाथांच्या बृहन्मूर्तीचा महामस्तकाभिषेक लक्ष्मीसेन जैन मठातील सोहळा : क्षेत्रपाल ब्रह्मदेव मूर्तीची झाली प्रतिष्ठापना

By admin | Updated: May 19, 2014 00:42 IST

कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील स्वस्तिश्री महास्वामी लक्ष्मीसेन जैन मठामध्ये १९६२ मध्ये प्रतिष्ठापित झालेल्या जैन धर्मियांच्या तीर्थंकर

 कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील स्वस्तिश्री महास्वामी लक्ष्मीसेन जैन मठामध्ये १९६२ मध्ये प्रतिष्ठापित झालेल्या जैन धर्मियांच्या तीर्थंकर मालिकेतील प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या २८ फूट उंच अमृतशीलेतील नयनमनोहर, बृहन्मूर्तीचा ५३ वा महामस्तकाभिषेक महोत्सव अत्यंत मांगल्यपूर्ण विधिवत मोठ्या श्रद्धेने-भक्तिभावनेने आज, रविवारी संपन्न झाला. या महोत्सवाचे अधिनेतृत्व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामीजी यांनी केले. याच महोत्सवासाठी जिनकंची धर्मपीठाचे (तमिळनाडू) परमपूज्य लक्ष्मीसेन महाराज आणि साध्वी आर्यिका सुधर्ममती माताजी यांची पावन उपस्थिती लाभली. सकाळी सहा वाजता जैन मठामध्ये मंगलवाद्य घोषणांनी महोत्सवास आरंभ झाला. सात वाजता ध्वजारोहण झाल्यानंतर भ. चंद्रप्रभ व भ. पार्श्वनाथांचा पंचामृताभिषेक झाला. महाशांतीमंत्र पठणानंतर मठस्थित नवीन मंदिरामध्ये क्षेत्रपाल ब्रह्मदेव मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. तसेच ९६ बीजाक्षरांतून क्षेत्रपाल विधान धर्मकार्य संपन्न झाले. या मूर्तीप्रतिष्ठा रायबाग निवासी पद्मश्री व अनंतनाथ शांतीनाथ शेट्टी यांनी केली. याचे प्रतिष्ठाचार्य अजित उपाध्ये (कोथळी), तर सहप्रतिष्ठाचार्य जिनदत्त उपाध्ये (शिरटी) यांनी केले. सायंकाळी पाच वाजता भ. १००८ श्री आदिनाथ तीर्थंकर पंचामृत मस्तकाभिषेक संपन्न झाला. सुरुवातीस भगवान आदिनाथ सुवर्णकलश ११ श्रावकांनी ढाळले. त्यानंतर १०८ कलश ढाळण्यात आल्यानंतर पंचामृत अभिषेकास आरंभ झाला. यामध्ये भगवंतांच्या चरणाजवळून पूजा साहित्याची पाद्यपूजा करण्यात आली. खोबर्‍याचा खिस, हरभरा डाळ, साखर, गूळ-तूप, दही व आमरसांनी भगवंतांची पाद्यपूजा विधिवत झाली. यावेळी महापौर सुनीता राऊत, आमदार राजेश क्षीरसागर, शरद इन्स्टिट्यूटचे अनिल बामणे, अजित आजरी, संजय गोपालकर, आदी तसेच शहरातील सर्वच मंदिराचे विश्वस्त तसेच श्रावक-श्राविका उपस्थित होते. त्यानंतर भगवंतांचा महामस्तकाभिषेक धर्ममंत्रोचारांत संगीत-वाद्यांच्या मंगलसुरांत सुवाद्य संपन्न झाला. यामध्ये दुग्धाभिषेक, इक्षु (उसाचा रस), अभिषेक, कलकचूर्ण, कुंकुमाभिषेक, हळद अभिषेक, अष्टगंध, पुष्पवृष्टी झाली. नंतर महाशांतीकलश ढाळून संगीत मंगल आरती झाल्यानंतर महाशांतीकलश ढाळून संगीत मंगल आरती होऊन सांगता झाली. या महोत्सवासाठी प. पू. लक्ष्मीसेन महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली धन्यकुमार जैन, पद्माकर कापसे, राजू उपाध्ये, अभय भिवटे, वसंत आडके, अजित सांगावे, आदींनी संयोजन केले, तर पद्माकर उपाध्ये, सुरेश उपाध्ये, प्रशांत उपाध्ये, प्रमोद उपाध्ये, शशिकांत उपाध्ये, आदी शहरातील पंडितांनी कार्य केले. (प्रतिनिधी)