कोल्हापूर : श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रूकडीकर ट्रस्टच्यावतीने दादा महाराज सांगवडेकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील शिगाव व करंजे येथील तीन शाळांना संगणक व प्रोजेक्टर प्रदान करण्यात आला. यावेळी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा यंत्रणेचेही उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेच्या स्मशानभूमीला २१ हजार शेणी दान करण्यात आल्या.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर, चिकित्सालयाचे अध्यक्ष निरंजन सांगवडेकर, संगीता सांगवडेकर, बाळ सांगवडेकर, राम सांगवडेकर उपस्थित होते.
०३०४२०२१ कोल विश्वपंढरी
सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर यांच्या जयंतीदिनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शाळांना संगणक प्रदान करण्यात आले. यावेळी आनंदनाथ सांगवडेकर उपस्थित होते.