चैत्र पौर्णिमेपूर्वी दरवर्षी पाकाळणी केली जाते. लॉकडाऊनच्या नियमानुसार जोतिबा मंदिरातील मोजक्याच पुजाऱ्यांनी जोतिबा मंदिराची स्वच्छता करण्यात सुरुवात केली. स्वच्छ पाण्याचे फवारे मारून मंदिराची स्वच्छता केली. सकाळी मंदिरात जोतिबा, महादेव, नंदी, चोपडाई, काळभैरव, यमाई मंदिरातील देवता कृत्य साहित्याची स्वच्छता करून मंदिर परिसर चकाचक केला.
आंतर्बाह्य मंदिराच्या स्वच्छतेला आध्यात्मिक क्षेत्रात पाकाळणी करणे असे म्हणतात. जोतिबा मंदिरात वर्षातून तीनवेळा पाकाळणी साजरी केली जाते. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी आणि चैत्र यात्रेपूर्वी व नंतर अशा तीन पाकाळणी साजऱ्या करून मंदिर स्वच्छ केले जाते. दीपमाळ, दगडी कमान, शिखरे, सदर यांच्यावर पाण्याचे फवारे मारले. .पालखी, धूपारती सोहळ्याच्या साहित्याची स्वच्छता केली. मंदिरातील काही मोजकेच खंडकरी, देव सेवक, देवस्थान समिती, बी. व्ही. जी. ग्रुपचे कर्मचारी स्वच्छतेत सहभागी होते.
१२जोतिबा
जोतिबा मंदिरात पाण्याचे फवारे मारून स्वच्छता करताना पुजारी.