शहरं
Join us  
Trending Stories
1
"'मी गौमांस खातो, कोण मला आडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवण करतायेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
2
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
3
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
5
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
6
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
7
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
8
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
9
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
10
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
11
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
12
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
13
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
14
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
15
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
16
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
17
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
18
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
19
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
20
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

बालपणाच्या उत्सवाला विधायकतेचे कोंदण, बालदिन उत्साहात : विविध उपक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:29 IST

बालपण म्हणजे निरागस, निर्मळ, गोंडस आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारा काळ. लहानग्यांच्या बाललीलांपासून ते अगदी वयोवृद्धांपासून सगळ्यांमध्ये लपलेल्या बालमनाला शुभेच्छा देत गुरुवारी बालदिन साजरा झाला. यानिमित्त लहान मुलांशी संबंधित विविध संस्था, संघटनांकडून बालहक्क जागृतीसंबंधीचे विधायक कार्यक्रम घेण्यात आले.

ठळक मुद्देबालपणाच्या उत्सवाला विधायकतेचे कोंदणबालदिन उत्साहात : विविध उपक्रमांचे आयोज

कोल्हापूर : बालपण म्हणजे निरागस, निर्मळ, गोंडस आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारा काळ. लहानग्यांच्या बाललीलांपासून ते अगदी वयोवृद्धांपासून सगळ्यांमध्ये लपलेल्या बालमनाला शुभेच्छा देत गुरुवारी बालदिन साजरा झाला. यानिमित्त लहान मुलांशी संबंधित विविध संस्था, संघटनांकडून बालहक्क जागृतीसंबंधीचे विधायक कार्यक्रम घेण्यात आले.भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन असलेला १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा होतो आणि या निमित्ताने बालपणाचा उत्सव साजरा होतो. गुरुवारी बहुतांश शाळा सुरू असल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. मुलांना खास खाऊही देण्यात आला. काही शाळांमध्ये खेळ, स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.बालहक्क आणि अधिकारांसाठी काम करणाऱ्या ‘चाईल्डलाईन’तर्फे बालदिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, त्याची सुरुवात बालकल्याण समितीचे सदस्य व्ही. बी. शेटे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ‘चाईल्डलाईन’च्या कामाचे कौतुक केले. सांगली मिशन सोसायटीचे अध्यक्ष फादर ज्योबी यांनी ‘चाईल्डलाईन’ने मुलांच्या विकासाच्या कार्याला हातभार लावावा, अशी सूचना केली.

फादर रोशन वर्गीस यांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून वाचनाची आवड जोपासावी, असे सांगितले. केंद्र समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी ‘चाईल्डलाईन’च्या कामाची माहिती दिली; तसेच मुलांना काही मदत हवी असल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

दरम्यान, भवानी मंडप, शिवाजी चौक, बिंदू चौक, रेल्वेस्थानक येथे पथनाट्याद्वारे मुलांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. विविध सामाजिक संस्थांकडून बालचमूंना शालेय साहित्य, खेळणी, खाऊ देण्यात आला.

दत्ताबाळ हायस्कूलमध्ये शिक्षक दिगंबर बालदे यांनी पंडित नेहरूंच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली. यावेळी अध्यक्षा पल्लवी देसाई, सचिव नीलेश देसाई, व्यवस्थापक संदीप डोंगरे, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे उपस्थित होत्या.बालपणाची आठवणबालदिनाच्या निमित्ताने अनेकांनी आपली बालपणाची छायाचित्रे समाजमाध्यमांवरून प्रसारित केली. प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेल्या बालमनाला साद घालत शुभेच्छा देण्यात आल्या. काहीजणांनी आपल्या कुटुंबातील लहानग्यांचे निरागस फोटो प्रसारित केले. त्यामुळे बालदिन केवळ लहान मुलांपुरता मर्यादित न ठेवता सगळ्यांनीच आपल्या बालपणीच्या आठवणी जागविल्या.

 

 

टॅग्स :children's dayबालदिनkolhapurकोल्हापूर