वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या सर्व विभागामध्ये उपक्रमांचे आयोजन केले होते. वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य, सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपास्थित होते.
प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर म्हणाले, तात्यासाहेब कोरे यांनी ग्रामीण भागातील अभियंता जागतिक स्तरावर पोहोचावा म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना १९८३ मध्ये केली. ३८ वर्षांत महाविद्यालयाच्या जडणघडणीत विविध घटकांचा सहभाग आहे.
यावेळी डॉ. डी. एम. पाटील, डॉ. डी. एन. माने, डॉ. अमोल पाटील, प्रा. विशाल सनदे, अनुजा शिरगुप्पे, विनायक यादव, डॉ. जी. व्ही. पाटील, प्रा. महेश भोसले, प्रा. सचिन उरबिनहट्टी, मनोज पाटील, प्रा. पी. जे. पाटील, प्रा. एस. टी. पाटील, प्रा. एन. एच. शिंदे, एस. आर. पाटील, डॉ. पी. व्ही. मुळीक, सचिन कांबळे, प्रा. सी. पी. शिंदे, प्रा. वरवंटे, डॉ. मार्क मोनीस यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
---
फोटो ओळी:
तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३८ व्या वर्धापन दिनप्रसंगी वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, विभागप्रमुख, रजिस्ट्रार व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होेते.