कोल्हापूर : भावा-बहिणीच्या अतूट नात्याला रेशमी धाग्यात बांधणाऱ्या राखी पौर्णिमेनिमित्त ‘लोकमत’च्यावतीने रक्षाबंधन संदेश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या संदेशाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रेमळ नात्यातील हळुवार भावना शब्दबद्ध करू शकता.भारतीय संस्कृतीत सणवार, उत्सवांना विशेष महत्त्व असून, त्या प्रत्येक सणामागे एक धार्मिक कारण तर आहेच, शिवाय या सणांनी नात्यांमधला जिव्हाळा अधिक वृद्धिंगत केला आहे. आई-वडील, गुरू-शिष्य, पती-पत्नी, भाऊ-बहीण अशा सगळ्या मानवी नातेसंबंधांना या सणांची उत्साही झालर लाभली आहे. त्यातील एक सण म्हणजे रक्षाबंधन. भाऊ-बहिणीच्या नात्याचा मान राखण्याचा हा सोहळा. ही नाती रक्ताची आणि मानलेलीही. यादिवशी राखीच्या माध्यमातून भाऊ बहिणीला तिच्या संरक्षणाचे वचन देतो, तर बहीण भावाचा हा आश्वस्त हात सदैव सोबत असो, अशी भावना व्यक्त करते. भावा-बहिणीच्या नात्यातील आठवणी, एकमेकांबद्दल असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘लोकमत’ने या संदेश स्पर्धेचे आयोजन केले आहे. जाहिरात पुरस्कृत असलेल्या या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास ‘वामाज’कडून पैठणी बक्षीस दिली जाईल. द्वितीय क्रमांकाच्या तीन विजेत्यांना ‘ओंकार होम अप्लायन्सेस’कडून इंडक्शन शेगडी, तर तृतीय क्रमांकाच्या पाच विजेत्यांना ‘स्वर्ग ज्वेलर्स’कडून अँटीक नेकलेस सेट भेट देण्यात येणार आहे. यासह पाचजणांना उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. ही जाहिरात शनिवार (दि. ९)पर्यंत स्वीकारली जाईल. संदेश पाठविण्यासाठी इच्छुकांनी ‘लोकमत’ कार्यालय, कोंडा ओळ येथे व अधिक माहितीसाठी ९७६६८०२८२५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भावा-बहिणीच्या नात्याचा गोडवा जपा; ‘लोकमत’चा पुढाकार
By admin | Updated: August 8, 2014 00:17 IST