शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय करणार समीरची चौकशी

By admin | Updated: March 25, 2016 00:02 IST

न्यायालयाची परवानगी : जामीन पुन्हा नाकारला

कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासकामी चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा जबाब नोंदविणार आहे. बुधवारी (दि. २३) अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी ‘सीबीआय’च्या यासंबंधीच्या विनंती अर्जाला परवानगी दिली. त्यामुळे सीबीआयचे अधिकारी कळंबा मध्यवर्ती कारागृहात समीर गायकवाडची चौकशी करून त्याचा लवकरच जबाब घेण्याची शक्यता आहे. समीर गायकवाडचा जामीन अर्ज न्यायालयाने बुधवारी दुसऱ्यांदा फेटाळला. दरम्यान, दि. २९ मार्च रोजी पानसरे हत्येच्या सुनावणीवेळी समीर गायकवाड हा न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे.गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित व सनातन संस्थेचा साधक असलेला समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर कोल्हापुरातील न्यायसंकुलामध्ये बिले यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी समीर गायकवाडचा जामीन अर्ज मंजूर करावा, (पान १ वरून) अशी केलेली विनंती न्यायालयाने फेटाळली. यावेळी नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपासकामी समीर गायकवाडची चौकशी करण्याची परवानगी मिळावी अशी विनंती करणारा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अर्ज जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांनी न्यायालयात सादर केला. न्यायालयाने तो मंजूर केला आणि कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला तशा सूचना केल्या जातील, असे स्पष्ट केले. यावेळी अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, सीबीआयचे अतिरिक्त उपायुक्त सतीश देवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांच्यासह अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, मेघा पानसरे, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, आदी उपस्थित होते.एस. आर. सिंग करणार चौकशीनरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक एम. एम. कलबुर्गी या तिघांच्याही हत्यांमध्ये साधर्म्य असल्याने तसेच तपासाचा भाग म्हणून सीबीआय समीर गायकवाडची चौकशी करणार आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणारे सीबीआयचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. आर. सिंग यांच्यासह अन्य अधिकारी कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात लवकरच जाऊन समीरची चौकशी करून जबाब घेतील.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणारे अधिकारी दैनंदिन तपासाची माहिती उच्च न्यायालयाला देत आहेत. त्यामुळे पानसरे हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे न्यायालयाचे मत आहे.-अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, विशेष सरकारी वकीलजिल्हा न्यायालयाने समीरचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहोत. समीरचा जबाब घेताना सीबीआयने सक्षम अधिकारी समवेत घ्यावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. तसेच २९ मार्चला सुनावणीवेळी समीर हजर राहण्याची शक्यता आहे.- अ‍ॅड. समीर पटवर्धन, समीर गायकवाडचे वकीलदाभोलकर यांच्या हत्येवर प्रकाशझोतपुणे येथे २० आॅगस्ट २०१३ रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास ९ मे २०१४ रोजी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्यात आला. त्यानुसार सीबीआय दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करीत आहेत.