शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कायदा रोखण्यासाठी पुजाºयांकडून जातीयवाद : कोल्हापूर अंबाबाई मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:01 IST

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराचा प्रश्न कोल्हापूरशी निगडित असताना काही पुजाºयांनी जाणीवपूर्वक पुण्यात बैठक घेऊन जनतेची दिशाभूल केली आहे.

ठळक मुद्दे पुजारी हटाओ संघर्ष समिती आक्रमककोल्हापूरच्या जनतेला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा व सरकारविरोधात न्यायालयात जाऊ,

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराचा प्रश्न कोल्हापूरशी निगडित असताना काही पुजाºयांनी जाणीवपूर्वक पुण्यात बैठक घेऊन जनतेची दिशाभूल केली आहे. जाहीर माफीनामे देऊनही धादांत खोटे बोलणाºया या पुजाºयांनी शासननियुक्त पुजारी नेमण्याचा कायदा होऊ नये म्हणून या विषयाला राज्य पातळीवर जातीवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पुन्हा कोल्हापूरच्या जनतेला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटवू, असा इशारा शनिवारी ‘श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समिती’ने पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.

कोल्हापुरातील गजानन मुनीश्वर, मकरंद मुनीश्वर यांच्यासह काही पुजाºयांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अंबाबाईच्या मूर्तीला घागरा-चोळी नव्हे, तर साडी नेसविण्यात आली होती. आम्ही जनभावना मानत नाही. पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा व सरकारविरोधात न्यायालयात जाऊ, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे नागपूर अधिवेशनात कायदा करण्याचे आश्वासन आणि सणांमुळे थंडावलेला हा विषय पुन्हा चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

याबाबत संघर्ष समितीचे दिलीप पाटील, माजी आमदार सुरेश साळोखे, वसंतराव मुळीक, प्रा. जयंत पाटील, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्यासह इतरांनी संघर्ष समितीची भूमिका स्पष्ट केली.इंद्रजित सावंत म्हणाले, पुजाºयांनी अंबाबाई मूर्ती वाचविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. कोणत्याही न्यायालयाने पुजाºयांना अंबाबाईच्या गाभाºयाचा अधिकार दिलेला नाही. यावेळी देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, प्रा. जयंत पाटील, प्रताप वरुटे, मुरलीधर जाधव, चारूलता चव्हाण उपस्थित होत्या.‘ईडी’ आणि ‘आयकर’तर्फे चौकशी करा...दिलीप पाटील म्हणाले, पुजाºयाला आठवड्याला दोन लाख रुपये मिळतात, असे सांगण्यात आले आहे. मात्र, मागील महिन्यात देवस्थान समितीला दानपेटीतून सव्वा कोटीचे उत्पन्न मिळाले. समितीला अंबाबाईच्या उत्पन्नातील दोन टक्के उत्पन्न मिळत असताना ही रक्कम असेल तर पुजाºयांना मिळणाºया ९८ टक्के उत्पन्नाचा आकडा किती मोठा असेल, हे लक्षात येईल. त्यांच्या संपत्तीची ‘ईडी’ आणि ‘आयकर’कडून चौकशी व्हायला हवी आणि त्यांच्या म्हणण्यानुसार दोन लाख रुपये देऊन पगारी पुजारी नेमण्यात यावेत. दिलेल्या आश्वासनानुसार कायदा झाला नाही तर मात्र राज्यभर ही व्यापक चळवळ उभारली जाईल.