शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाड्या-वस्त्या, रस्ते, गावांची जातीवाचक नावे तपासून बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:41 IST

collector Kolhapur : संबंधित वाड्या-वस्त्या, गावांना, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलुन महापुरूषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत  नावे  देताना कोणत्याही प्रकारचा वाद उद्भऊ नये यासाठी शासन स्तरावर ज्या महापुरूषांची जयंती साजरी केली जाते,अशाच महापुरूषांची  नावे देण्यात यावीत जेणेकरून सामाजिक सलोखा व सौहार्द  निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होईल, याबाबत माहिती गोळा करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत दसाई यांनी केली.

ठळक मुद्देवाड्या-वस्त्या, रस्ते, गावांची जातीवाचक नावे तपासून बदलणार प्रशासनाची जातीवाचक नावे बदलाबाबत माहिती जमा करण्याची मोहीम

 कोल्हापूर : संबंधित वाड्या-वस्त्या, गावांना, रस्त्यांची जातीवाचक  नावे  बदलुन महापुरूषांची  व  लोकशाही  मूल्यांशी  निगडीत  नावे  देताना कोणत्याही प्रकारचा वाद उद्भऊ नये यासाठी शासन स्तरावर ज्या महापुरूषांची जयंती साजरी केली जाते, अशाच  महापुरूषांची  नावे देण्यात यावीत जेणेकरून सामाजिक सलोखा व सौहार्द  निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होईल, याबाबत माहिती गोळा करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत दसाई यांनी केली.जातीवाचक नावांऐवजी महापुरूषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या  अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आज पार पडली यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने,  महानगरपालिका शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, जिल्हा प्रशासन अधिकारी दिपक पाटील आदी उपस्थित होते.             प्रारंभी जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी एखाद्या वस्तीचे वा रस्त्याचे नाव जातीवाचक नाव बदलावयाचे असल्यास, त्या अनुषंगाने संबंधीत गावाने तसा ठराव पास करून त्याबाबतचा प्रस्ताव संबंधीत गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करून गट विकास अधिकारी यांनी सदर प्रस्ताव तपासुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवावा.

त्यांनी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस्तव पाठविल्यानंतर शासन स्तरावर प्रस्तावाची तपासणी करून मत्री महोदयांच्या मान्यतेने त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती दिली.  त्यावर  सध्या  कोविड-19  या  महामारीच्या  पार्श्वभूमीवर ग्रामसभा होत नसल्याने सध्याच्या काळात किती नावे बदलता येतील याची माहीती गोळा करण्यात यावी अशी  सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केली.

 या बैठकीमध्ये  गट विकास  अधिकारी  व  नगरपालिकांचे  मुख्याधिकारी  यांनी  बहुतांशी बाबींमध्ये  कागदोपत्री जातीवाचक  नावे आढळून येत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर, अशा प्रकरणांमधील माहिती गोळा करून संबंधित विभागांना पाठवावी व त्यावर शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी  सूचित केले. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर