शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तनवडीत शेतमजुरांचा कॅशलेस पगार

By admin | Updated: January 16, 2017 01:01 IST

पांडुरंग आरबोळेंची सुविधा : पॉश मशीनचा वापर; प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते वितरण

संजय थोरात ल्ल नूलआपण अल्पशिक्षित असलो तरी आपल्या नर्सरीतील कामगार व्यवहार चातुर्य बनला पाहिजे, यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील तनवडी येथील शेतकऱ्याने सर्वच कामगारांचा पगार ‘कॅशलेस’ सुरू केला आहे. पांडुरंग सदाशिव आरबोळे (रा. तनवडी) असे त्यांचे नाव आहे. तंत्रज्ञानाचा वापर स्वत:बरोबरच आपल्या कामगारांनाही करायला लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे. पांडुरंग यांनी दहावीतून शिक्षण बंद केले. त्यांनी बायोगॅस प्लॉटबांधणीचा व्यवसाय सुरू केला. मात्र, ते आर्थिक संकटात आले. पाच वर्षांपूर्वी वडिलोपार्जित शेतीत लक्ष घालून वेगवेगळे प्रयोग सुरु केले. शेती हेच आर्थिक उत्पन्नाचे साधन सापडल्यावर कल्पवृक्ष नावाची नर्सरी सुरू केली. ऊस बियाणे, मिरची, वांगी, टोमॅटो, कोबी, भेंडी यांची रोपे तयार करू लागले. वेगवेगळे तंत्रज्ञान, शेततळी, गांडूळखत निर्मितीच्या माध्यमातून त्यांचा कल्पवृक्ष सध्या फुलला आहे.नर्सरीत सध्या अठरा कामगार आहेत. ही नर्सरी अठरा कुटुंबांचा आधार बनली आहे. आठवड्याला १५ हजार रुपये कामगारांना पगार द्यावा लागतो. नोटाबंदीनंतर सर्वत्र कॅशलेसचे वारे वाहू लागले. आरबोळेंना ही संकल्पना आवडली म्हणून त्यांनी कॅशलेस व्यवहार सुरू केले. शिवाय कामगारांना सवय लागावी म्हणून त्यांचे पगार ‘पॉश’ मशीनद्वारे कॅशलेस प्रणालीप्रमाणे देण्यास सुरुवात केली. नूलच्या बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये सर्वांची बचत खाती उघडली आहेत. शाखाधिकारी सायमन मस्करेन्हस, बँक प्रतिनिधी प्रवीण आरबोळे यांचे सहकार्य लाभले.या सुविधेचा प्रारंभ प्रांताधिकारी संगीता चौगुले, तहसीलदार राजेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. या अधिकाऱ्यांनीही आरबोळेंच्या कल्पकतेचे कौतुक केले. यावेळी माजी उपसभापती विनोद नाईकवाडी, बसवराज आरबोळे, गुरगोंडा पाटील, उपसरपंच व्ही. बी. पाटील, पुंडलिक कदम, बाळासाहेब आरबोळे, माधव सावंत, राजू तेरणीकर, सागर सुतार, शेखर मोर्डी, सुवर्णा आरबोळे, चेतन आरबोळे, कामगार, उपस्थित होते.