शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
3
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
4
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
5
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
6
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
7
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
8
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
9
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
10
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
11
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
13
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
14
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
15
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
16
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
17
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
18
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
19
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
20
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान न मिळाल्यास बँकेचे व्यवहार बंद पाडणार

By admin | Updated: March 9, 2017 18:58 IST

हसन मुश्रीफ यांचा इशारा : कागल तालुका राष्ट्रवादीचे आंदोलन

अनुदान न मिळाल्यास बँकेचे व्यवहार बंद पाडणारहसन मुश्रीफ यांचा इशारा : कागल तालुका राष्ट्रवादीचे आंदोलनकोल्हापूर : कागल तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, इंगांयो योजनेतील लाभार्थ्यांना आय.सी.आय.सी.आय. बँकेकडून फिनोपेटेक कंपनीमार्फत अनुदान दिले जाते. शासनाकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा असताना ते लाभार्थ्यांना वेळेत दिले जाते नाही. हे अनुदान तत्काळ देऊन बॅँकेने आपल्या कारभारात महिन्यात सुधारणा करावी, अन्यथा जिल्ह्यातील आय.सी.आय.सी.आय. बँकेचे सर्व व्यवहार बंद पाडू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी बँकेचे जनरल हेड गोपाळ उन्हाळे यांना दिला. कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गुरुवारी सकाळी आय.सी.आय.सी. आय. बँकेच्या कोल्हापुरातील बागल चौक शाखेसमोर आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी शिष्टमंडळाने बँकेचे जनरल हेड उन्हाळे यांची भेट घेतली. आय.सी.आय.सी.आय. बँकेकडून संजय गांधी, श्रावणबाळ, इंगांयो योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाटपाचे काम फिनोपेटेक कंपनीकडे दिले आहे. मात्र अनुदान वाटप करणारे कर्मचारी लाभार्थ्यांना उद्धट उत्तरे देतात, अनुदान घेण्यासाठी घरी बोलावतात. विनाकारण हेलपाटे मारवायास भाग पाडतात. आधार कार्डाचे अंगठे जुळत नाहीत, अशी कारणे पुढे करतात. पे-लिस्टवर रक्कम असूनही बायोमेट्रिक मशीनवर लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम नसणे अशी अनेक कारणे पुढे करून अनुदान दिले जात नाही. खात्यावर पैसे असूनसुद्धा हजारो लाभार्थ्यांना सहा-सहा महिने अनुदान मिळत नाही. त्यामुळे हा पैशांचा वापर बँक करीत असल्याचा आरोपही यावेळी आमदार मुश्रीफ यांनी केला.लाभार्थ्यांमध्ये ६५ वर्षांवरील निराधार स्त्री, पुरुष, अंध, अपंग, विधवा, परित्यक्ता, अनाथ मुलांचा समावेश आहे. या प्रकारामुळे लाभार्थ्यांच्या उपजीविकेचा व औषधोपचारांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे सर्व प्रकार तत्काळ थांबवावेत व फिनोपेटेक कंपनीकडून हे काम काढून घ्यावे; अन्यथा, बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांतील व्यवहार बंद पाडले जातील, असा इशाराही शिष्टमंडळाने यावेळी दिला. आंदोलनात जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शिवानंद माळी, संजय गांधी योजना समितीचे माजी अध्यक्ष भैया माने, महिला अध्यक्ष मनीषा पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे, नगराध्यक्ष माणिक माळी, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विकास पाटील, उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, सभापती शशिकांत खोते, संजय हेगडे, प्रकाश गाडेकर, बाळासो तुरंबे, रमेश तोडकर, राजेंद्र माने, आदी उपस्थित होते. -----------------अधिकाऱ्यांना धारेवर धरलेआमदार हसन मुश्रीफ यांच्यासह कागल येथील मोठ्या प्रमाणातील कार्यकर्ते आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या कोल्हापुरातील बागल चौक शाखेसमोर आले होते. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हसन मुश्रीफ यांनी यावेळी बँकेतील अधिकाऱ्यांना प्रलंबित लाभार्थ्यांच्या अनुदानाबाबत चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तुम्ही गरिबांचे अनुदान देत नाही. तुमचा एक महिन्याचा पगार दिला नाही तर काय करणार? अशी थेट विचारणा यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना केली.