शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

श्रेयवादातून भडगावच्या स्मशानशेड कामाला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:02 IST

अंत्यसंस्काराला जागाच नाही : रस्त्यावरच द्यावा लागतो अग्नी

मुरगूड : कागल तालुक्यातील भडगाव मध्ये ६० वर्षांपासून प्रलंबित असलेला स्मशानशेडचा प्रश्न आजही आहे त्या अवस्थेतच आहे. ग्रामपंचायतीने मिळालेल्या निधीतून स्मशानशेड बांधण्यास सुरुवात केली; पण जागेच्या वादातून हा प्रश्न न्यायालयात गेला आहे. कामास परवानगी मिळते तर कधी स्थगिती, त्यामुळे स्मशानशेडचा प्रश्न अधांतरी राहिला आहे. त्यामुळे सध्यातरी गावातील मृत लोकांवर रस्त्याकडेला किंवा शेतजमिनीत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. मुरगूडपासून तीन किलोमीटर अंतरावर असणारे भडगाव हे प्रगतशील गाव आहे. राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रांत गावाचा लौकिक आहे. अगदी राज्यपातळीपर्यंतची अधिवेशने, कबड्डी सामने या गावात अत्यंत उत्साहात पार पडले आहेत; परंतु, ‘गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं’ अशीच काहीशी गावची अवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी येथील एका भूमिहीन महिलेवर मुख्य रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्यात आले, तर विजेच्या धक्क्याने मृत झालेल्या दुर्दैवी बापलेकांवर त्यांच्या नातलगांच्या शेतात चिखलात सरन रचून ऐन पावसामध्ये अंत्यसंस्कार करावे लागले. याला स्मशानशेडच्या श्रेयवादाचे राजकारण कारणीभूत ठरत आहे. या घटनेची चर्चा गावासह मुरगूड परिसरात होत आहे.गावातीलच एका भूमिहीन महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. गावात स्मशानशेड नाही, स्वत:ची शेती किंवा रिकामी जागाही नाही, त्यामुळे नेमके कुठे अंत्यसंस्कार करायचे? असा प्रश्न निर्माण झाला. अखेर कागल-मुरगूड रस्त्यावरील रिकाम्या जागेत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. परंतु, त्या ठिकाणीही काही नागरिकांनी विरोध केला. अखेर मुख्य रस्त्याकडेलाच अंत्यसंस्कार करण्यात आले. कागल-मुरगूड रस्त्याकडेला सरन रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या नातेवाइकांवर आली. त्यालाही आमच्या शेतीसमोर नको,म्हणून विरोध होत असताना संतप्त नातेवाइकांकडून पोलिसांत तोंडी तक्रार देण्यात आली. अखेर ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित मंडळींनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार पार पडले. या निमित्ताने पुन्हा एकदा स्मशानशेडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून स्मशानशेडचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.येथील स्मशानशेडचे जागेअभावी काम रखडले होते. गतसाली सरपंच कल्पना पाटील व ग्रामपंचायतीने गावातील जाणकारांच्या मदतीने जागेचा प्रश्न मिटवला होता. त्यासाठी जिल्हा परिषद फंडातून निधी मंजूर होऊन बांधकामास प्रारंभही करण्यात आला होता. काम अंतिम टप्प्यात असतानाच पुन्हा जागेचा प्रश्न उफाळून आला आणि प्रकरण न्यायालयात गेले. पहिला निकाल ग्रामपंचायतीच्या बाजूने लागला आणि स्मशानशेडचे काम अंतिम टप्यात असतानाच न्यापालयाने स्थगिती दिली आहे. (वार्ताहर)जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवाज्याची स्वत:ची शेती, मोकळी जमीन आहे, त्यांच्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्यास ते आपआपल्या शेतात अंत्यसंस्कार करतात. परंतु जे गरीब आहेत, भूमिहीन आहेत, ज्यांची काहीच जमीन नाही, त्यांनी कुठे जायचे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुजलाम् सुफलाम् असणाऱ्या गावात राजकारणातून व श्रेयवादातून स्मशानशेडच्या बांधकामाला ‘खो’ ंबसणे दुर्दैवी आहे. ऐन पावसाळ्यामध्ये उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. गावातील सर्व गटा-तटांच्या लोकांनी मोठ्या मनाने मानसिकता दाखवून हा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांसह परिसरातून होत आहे.