शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

उद्यापासून कोयनेतून कर्नाटकचे पाणी बंद

By admin | Updated: April 29, 2016 00:50 IST

आणखी एक टीएमसीची मागणी : अक्कलकोटला पाणी देण्यास विलंब

सदानंद औंधे-- मिरजकोयनेतून एक टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर आणखी एक टीएमसी पाण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. मात्र, राज्य शासनाने कर्नाटकला आणखी पाणी सोडण्याबाबत असमर्थता दर्शवून अक्कलकोटला पाणी सोडण्याची मागणी केली आहे. उद्या, शनिवारपासून कोयनेतून कर्नाटकसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येणार आहे. कर्नाटक सीमाभागात तीव्र पाणीटंचाई असल्याने बुधवारपासून कोयना व वारणा धरणांतून एक टीएमसी पाणी सोडण्यात आले. कर्नाटकातील जमखंडीजवळ हिप्परगी धरणापर्यंत हे पाणी पोहोचले आहे. राजापूर बंधाऱ्यातून ६०० एमसीएफटी पाणी कर्नाटकात गेले असून, उद्यापर्यंत एक टीएमसी पाणी कर्नाटकात पोहोचणार असल्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्या कोयना धरणातून विसर्ग बंद करण्यात येणार असून, गुरुवारपासून कोयनेतून प्रतिसेकंद चार हजार क्युसेक्स वेगाने सोडण्यात येणारे णी दोन हजार क्युसेक्स प्रतिसेकंद करण्यात आले आहे. कर्नाटकात हिप्परगी धरणापर्यंत पाणी पोहोचले असून, पाच टीएमसी क्षमतेच्या हिप्परगी धरणात पाणीसाठा करण्यासाठी आणखी एक टीएमसी पाणी सोडण्याची कर्नाटकची मागणी आहे. पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कर्नाटकातील शिष्टमंडळाने मुंबईत तळ ठोकला आहे. कोयनेची वीजनिर्मिती थांबवून दहा टीएमसी पाणीसाठा सिंचन व पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येत आहे. या पाणीसाठ्यापैकी आणखी एक टीएमसी पाण्याची कर्नाटकची मागणी आहे. मात्र, कोयना व वारणा धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. जूनमध्ये पाऊस पडला नाही, तर उर्वरित पाणी आवश्यक असल्याने कर्नाटकला आणखी पाणी देण्यास जलसंपदा विभागाने असमर्थता दर्शविली आहे. कर्नाटकसाठी कोयना व वारणेतून तातडीने पाणी सोडण्यात आल्यानंतर कर्नाटकातून पाणी देण्यासाठी विलंब करण्यात येत आहे. कर्नाटकला एक टीएमसी पाणी देताना नारायणपूर धरण व हिरेपडसलगी योजनेतून अक्कल-कोटला पाणी सोडण्याचे ठरले आहे. मात्र, अद्याप पाणी सोडले नसल्याने कर्नाटकातून अक्कलकोटला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.पाण्याची देवाण-घेवाणकर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगावसह अन्य दुष्काळी भागाचा दौरा करून पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी यापुढे दरवर्षी महाराष्ट्रासोबत चार टीएमसी पाण्याची देवाण-घेवाण करू, असे जाहीर केले. गुरुवारी बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी उगार येथे पाहणी करून महाराष्ट्रातून आणखी पाणी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.