शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कॅप्टन शरद पवार जहाज पैलतीराला नेतील : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:29 IST

प्रचंड वादळ वाऱ्यात आणि खवळलेल्या समुद्रातही कॅप्टन शरद पवार हे राष्ट्रवादीचे जहाज पैलतीराला नेऊन लावतील. जहाज बुडतंय अस समजून पळून गेलेल्या उंदरांची अवस्था मात्र त्यावेळी बघण्यासारखी होईल, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला.

ठळक मुद्देकॅप्टन शरद पवार जहाज पैलतीराला नेतील : हसन मुश्रीफराष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता राज्यात येणार

कसबा सांगाव : प्रचंड वादळ वाऱ्यात आणि खवळलेल्या समुद्रातही कॅप्टन शरद पवार हे राष्ट्रवादीचे जहाज पैलतीराला नेऊन लावतील. जहाज बुडतंय अस समजून पळून गेलेल्या उंदरांची अवस्था मात्र त्यावेळी बघण्यासारखी होईल, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला.

येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता येणार असा विश्वासही आमदार मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला. मौजे सांगाव ता कागल येथे घेण्यात आलेल्या माऊली विकास संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात आमदार मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी सुमन युवराज पाटील होत्या.मुश्रीफ म्हणाले, पाच वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेनेच्या सरकारने राज्यातील जनतेची घोर फसवणूक केली आहे. बंद पडलेल्या कंपन्या आणि उद्योगधंद्यांमुळे बेरोजगारीने तर कळसच गाठला आहे. त्यामुळे अपयश पदरी आलेले सरकारमधील हे पक्ष कितीही आमदार विकत घेऊ देत,आमदारांवर कितीही दबाव टाकू देत.

येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच त्यांना धुळीस मिळवेल.राष्ट्रवादी पक्ष सोडून पळून जाणा?्यांवर टीकास्त्र सोडताना आमदार मुश्रीफ म्हणाले, शरद पवारांनी अनेकांना मंत्री केले , सत्ता दिल्या , मोठमोठी पदे दिली आणि त्यांची भरभराटही झाली. आज मात्र पवारसाहेबांचा वृद्धापकाळ असताना ते त्यांना सोडून जात आहेत , ही बाब लाजिरवाणी आहे. कुणी काहीही करो , मी मात्र खंबीरपणे घट्ट पाय रोवून पवारसाहेबांसोबत त्यांच्या पाठीशी उभा आहे.स्वागत बाजार समितीचे माजी अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन के आर पाटील यांनी केले. सरपंच सौ स्वाती नंदकुमार पाटील यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर कागलच्या नगराध्यक्ष माणिक माळी, सबीना मुश्रीफ,अमरीन मुश्रीफ, वंदना पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. भोग सरलं, सुख येईल........मुश्रीफ म्हणाले, राज्यातील आजघडीचे सत्ताकारण कितीही अस्थीर असो. परंतु मला मात्र ठाम विश्वास आहे , दिस जातीलं, दिस येतील ! भोग सरलं, सुख येईल.... 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर