शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
5
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
6
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
7
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
8
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
9
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
10
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
11
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
12
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
13
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
14
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
15
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
16
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
17
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
18
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
20
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?

स्त्रियांमधील कर्करोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:51 IST

डॉ. भारती अभ्यंकर आतापर्यंत आपण स्त्रियांमध्ये आढळणारे अनेक प्रकारचे आजार जाणून घेतले. ते कशामुळे होतात, कसे टाळले जातात, त्यावर ...

डॉ. भारती अभ्यंकरआतापर्यंत आपण स्त्रियांमध्ये आढळणारे अनेक प्रकारचे आजार जाणून घेतले. ते कशामुळे होतात, कसे टाळले जातात, त्यावर कोणत्या प्रकारचे उपचार करता येतात वगैरे माहिती सांगण्याचा प्रयत्न मी केलाय ! आज मी तुम्हाला अशा एका व्याधीबद्दल सांगणार आहे जिचं नाव ऐकलं तरी आपल्याला प्रचंड भीती वाटायला लागते. ही व्याधी म्हणजे काय हे तुम्ही ओळखले असेलच ! यापुढील लेखात आपण स्त्रियांमधील ‘कॅन्सर’ म्हणजेच कर्करोगाबद्दल माहिती घेणार आहोत. कॅन्सर हा शब्द ग्रीक ङं१‘्रल्लङ्म२ म्हणजे उ१ुं पासून आलेला आहे. कर्क राशीचे प्रतीक असलेला खेकडा खूप काही सांगून जातो.१) कर्करोग / कॅन्सर म्हणजे काय ?शरीरामध्ये असाधारण पेशींची वाढ होणे, त्याची वाढ अनियंत्रित असणे, त्यामुळे एखाद्या अवयवामध्ये ही घटना घडून त्याचे पर्यवसान कर्करोगात होते.या पेशींची वाढ खूप झपाट्याने होते. त्यांच्यामध्ये निकटच्या अवयवामध्ये घुसण्याची क्षमता असते. त्यामुळे हा आजार लवकर पसरला जातो व वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास हा आजार मृत्यूला कारणीभूत ठरतो.२) हा आजार कशामुळे होतो ?बऱ्याच कर्करोगांचे कारण नक्की समजलेले नाही. त्याला अपवाद सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर !सर्व्हायकल कॅन्सर हा एकप्रकारच्या व्हायरसमुळे होतो. त्याचा शोध लागलेला आहे. हा व्हायरस म्हणजे ऌस्र५ (ऌ४ेंल्ल ढंस्र्र’’ङ्मेंश््र१४२)बºयाच वाईट सवयी ज्या व्यक्तींना आहेत. त्यांच्यामध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त असते. उदा. तंबाखू सेवन करणे, गुटखा खाणे, मद्यपान करणे, बाहेरख्यालीपणा असणे वगैरे.आहारसुद्धा खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. आरोग्यास अपायकारक अन्न खाणे. उदा. जंक फूड, पिझ्झा, बर्गर, ब्रेड, मांसाहार, विशेषत: रेडमीट, बीफ यांचा वापर वाईट असतो. अयोग्य किंवा वल्लँीं’३ँ८ आहारामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते, त्यामुळे इटक वाढतो. म्हणजे स्थूलता वाढते व अनेक नको असलेली संप्रेरके शरीरात तयार होतात. त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.शरीरांतर्गत गोष्टी जसे की गुणसूत्रांमधील बदल, कर्करोगास कारणीभूत ठरतात.स्त्रियांमध्ये स्तन आणि बीजकोष हे अनुवंशिक कॅन्सर आहेत म्हणजे ज्या स्त्रियांच्या आई, आजी किंवा आत्यांना स्तन किंवा बीजकोषाचा कॅन्सर असेल तर त्या स्त्रीला हे कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. अशा स्त्रियांनी सजग राहणे, वेळोवेळी तपासणी करणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते.ज्या महिलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते, त्यांच्यामध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त असते. उदा. अकऊर च्या बाधित महिला.स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारे कॅन्सर : १) स्तन (इ१ीं२३), २) आतडे, ३) फुफ्फुसे, श्वासनलिका, ४) गर्भाशयाचे मुख (ूी१५्र७), ५) पोटाचा कॅन्सर, ६) गर्भाशय पिशवीचा (एल्लङ्मिेी३१४े), ७) बीजकोषाचा कॅन्सर (डश्ं१्रंल्ल), ८) थायरॉईड वगैरे हा क्रम ज्या प्रमाणात कॅन्सर आढळतात त्यानुसार आहे; परंतु हा क्रम सन २०१२ मधील आहे. त्यामध्ये सन २०१७ च्या सर्वेक्षणानुसार बदल झाला आणि आताचा क्रम असा आहे. (भारतामध्ये) १) स्तन (इ१ीं२३), २) गर्भाशयाचे मुख, ३) आतडी, ४) बीजकोष, ५) फुफ्फु से, ६) गर्भाशय वगैरेया आजारांचे वेळीच निदान न झाल्यास त्याचे पर्यावसन मृत्यूत होते. भारतातील आकडेवारीनुसार, कॅन्सरमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या तीन लाख सव्वीस हजार तीनशे स्त्रिया दरवर्षी अशी आहे. त्यापैकी एकवीस टक्के स्त्रीया स्तनाच्या कॅन्सरमुळे तर वीस टक्के स्त्रिया गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात.ही आकडेवारी निश्चितच भीतीदायक आहे ना? ती टाळण्यासाठी किंवा त्यातील प्रमाण कमी करण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आकडेवारी इतकी जास्त का आहे. १) अनेक सामाजिक घटक याला जबाबदार ठरतात. आपल्या देशात असलेली गरिबी, अशिक्षितपणायामुळे आरोग्यविषयक अज्ञान वाढते वैद्यकीय सुविधा खेडोपाडी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे प्राथमिक अवस्थेमध्ये या आजाराचे निदान होऊ शकत नाही. साहजिकच गुंतागुंत वाढते व मृत्यूचे प्रमाण वाढते. २) बदलती जीवनशैली, वाढते शहरीकरण यामुळे अनेक शारीरिक व्याधी वाढतात. या गोष्टी आपण नक्कीच बदलू शकता. ३) वाढती व्यसने गुटखा, तंबाखू, मद्यपान या गोष्टींनाही अटकाव करणे प्रत्येक व्यक्तीच्या हातातली गोष्ट आहे. ४) सर्वांत शेवटी राजकीय निष्क्रीयता ! अनेक योजना आखल्या जातात परंतु त्या योग्यरितीने राबविल्या जात नाहीत. ‘सर्व्हायकल कॅन्सर’ याबद्दल अनेक देशांकडून शिकण्यासारखी खूप आहे. भूतानसारख्या देशात अनेक योजना राबवून ‘सर्व्हायकल कॅन्सर’चे प्रमाण आपल्यापेक्षा खूपच कमी केले आहे.(लेखिका कोल्हापुरातील स्त्री रोग वप्रसूतिशास्त्र तज्ज्ञ आहेत.)