शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
4
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
5
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
6
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
7
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
8
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
9
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
10
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
11
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
12
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
13
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
14
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
15
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
16
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
17
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
18
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
19
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर

कॅन्सर लवकर शोधणाऱ्या सेन्सरचे संशोधन : कोल्हापुरातील दोन प्राध्यापकांचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:21 IST

विश्वास पाटील ।कोल्हापूर : माणसाच्या शरीरातील ग्लुकोज लेव्हल जशी रक्ताच्या एका ड्रॉपची तपासणी करून समजू शकते तसे रुग्णाला कॅन्सर झाला आहे की नाही हे ओळखणे कसे शक्य होईल यासंबंधीचे संशोधन येथील न्यू कॉलेजमधील दोन प्राध्यापकांनी सुरू केले आहे.त्यांच्या या संशोधन प्रकल्पाचे महत्त्व ओळखून केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ...

विश्वास पाटील ।कोल्हापूर : माणसाच्या शरीरातील ग्लुकोज लेव्हल जशी रक्ताच्या एका ड्रॉपची तपासणी करून समजू शकते तसे रुग्णाला कॅन्सर झाला आहे की नाही हे ओळखणे कसे शक्य होईल यासंबंधीचे संशोधन येथील न्यू कॉलेजमधील दोन प्राध्यापकांनी सुरू केले आहे.त्यांच्या या संशोधन प्रकल्पाचे महत्त्व ओळखून केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाने त्यांना तीन वर्षांच्या प्रकल्पासाठी ३० लाख रुपयांची संशोधनवृत्ती मंजूर केली आहे. कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास अनेकांचा जीव वाचविणे शक्य होणार आहे.

मुरगूडचे डॉ. अशोक चौगले व कणेरीमठ (ता. करवीर) येथील डॉ. प्रशांत पाटील अशी या प्राध्यापकांची नावे आहेत. चौगले हे बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएच.डी आहेत. पाटील यांनी फिजिक्समध्ये सॉलिड स्टेटमध्ये संशोधन केले आहे. संशोधनात अनेक वर्षे काम केलेल्या वरिष्ठ प्राध्यापकांना व त्यातही विद्यापीठाच्या स्तरांवर काम करणाºयाला एक्स्ट्रा म्युरल रिसर्च (ईएमआर) करण्याची संधी मिळते, परंतु चौगले व पाटील यांना हा संशोधन प्रकल्प कॉलेजस्तरांवरच मिळाला आहे.कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या टप्प्यातच झाल्यास रुग्णाचा तो अवयव काढून टाकल्यास त्याचा जीव वाचविणे शक्य होते.

त्यासाठीच निदान लवकर होणे आवश्यक असते. आता शरीरातील ग्लुकोज लेव्हल इतक्या सुलभ व सहजपणे तपासणारी यंत्रणा उपलब्ध झाली आहे, तशीच यंत्रणा किंवासेन्सर तयार करण्याचा या प्राध्यापकांचा प्रयत्न आहे. या संशोधनात नॅनो पार्टिकल्स व स्पेसिफिक अ‍ॅन्टी बॉडीजचा वापर करण्यात येणार आहे.त्याची सेन्सिटीव्हीटी जास्त असेल, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अत्यंत सूक्ष्म पातळीवरही कॅन्सरची लागण झालेली असेल तरी ते यामध्ये ओळखले जाईल. देशात कॅन्सरच्या विविध प्रकारांचे वाढते रुग्ण, त्याचा उपचाराचा होणारा प्रचंड खर्चआणि मृत्यूचे प्रमाण याचाविचार करता या आजाराचे निदान लवकर होणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित होते. त्यादृष्टीनेया संशोधनाला देशपातळीवर आणि मानवी संपत्तीच्या दृष्टीनेही फारच महत्त्व येणार आहे. 

कॅन्सरचे प्राथमिक निदान लवकर झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची संधी असते; परंतु आता आमच्याकडे उपचारासाठी येणाºया एकूण रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण त्यांचा कॅन्सर तिसºया स्टेजला असताना डॉक्टरकडे येतात. फक्त २० टक्केच रुग्ण सुरुवातीच्या टप्प्यात आजार असताना डॉक्टरपर्यंत येतात. या आजारात निदान लवकर होणे हे अत्यंंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही संशोधन होत असेल तर ते उपयुक्तच ठरू शकेल.- डॉ. सूरज पवार, प्र्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ