शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील अन्यायी करवाढ रद्द करा-- सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 21:34 IST

इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडून कोणत्याही नागरी सुविधा पुरविल्या जात नसताना घरफाळ्यात केलेली २0 टक्क्यांची वाढ ही अन्यायी आहे.

ठळक मुद्दे;प्रांताधिकाºयांना निवेदन हरकतींवर झालेली सुनावणी नियमबाह्य, चुकीची

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : येथील नगरपालिकेकडून कोणत्याही नागरी सुविधा पुरविल्या जात नसताना घरफाळ्यात केलेली २0 टक्क्यांची वाढ ही अन्यायी आहे. हरकतींवर झालेली सुनावणी नियमबाह्य असून, चुकीच्या पद्धतीने झालेली कर आकारणी रद्द करण्यासंदर्भात समितीची पुन्हा बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्यावतीने प्रांताधिकारी तथा अपिलीय समितीचे अध्यक्ष समीर शिंगटे यांच्याकडे केली.

गेल्या आठवड्यात अपिलीय समितीच्या बैठकीत २0 टक्के घरफाळा वाढीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा सर्व स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकत्रित विरोध करण्यासाठी बैठक घेतली. त्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी प्रमुख प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्टÑीय कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, माकप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाकप, मनसे, सर्व श्रमिक संघ, भारिप, इचलकरंजी नागरिक मंच, आदींसह विविध पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी चर्चेत रस्त्यांची दुरवस्था, कचरा उठावचा प्रश्न, साफसफाईकडे होणारे दुर्लक्ष, आरोग्याचा बोजवारा, अशा अनेक त्रुटींचा पाढा वाचण्यात आला. त्यामुळे पायाभूत व मूलभूत सुविधा नगरपालिकेकडून दिल्या जात नसल्याने हा अन्यायी कर रद्द करावा. शहरातील यंत्रमाग व्यवसायाची परिस्थिती बिकट असल्याने सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्कील बनले आहे. या सर्व बाबींचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.त्यावर प्रांताधिकारी शिंगटे यांनी, अपिलीय समितीची कार्यकक्षा व अधिकार मर्यादित आहेत. त्यामुळे करवाढ कमी करण्याचा अधिकार समितीला नाही. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.सध्या जनतेच्या मनात तुम्हीच ‘खलनायक’अपिलीय समितीने २0 टक्के घरफाळा वाढीचा घेतलेला निर्णय हा जनतेसाठी अन्यायकारक असून, या समितीचे अध्यक्ष म्हणून प्रांताधिकारी आहेत. सध्याच्या चर्चेमध्ये विरोधकांसह सत्ताधारी व सर्वपक्षीय संघटना या करवाढीच्या विरोधात आहेत. करवाढीचा निर्णय समितीने घेतला. त्या समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही असल्याने जनतेच्या मनात सध्या तुम्ही खलनायकाच्या भूमिकेत आहात, अशी टिप्पणी आंदोलकांतील एकाने यावेळी मांडली.मुख्याधिकाºयांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जनतेला त्रासशहरातील सांगली रोडवरील गटारी वाहून गेलेला प्रश्न, कचºयाचा प्रश्न यांसह गेल्या पावसाळ्यात वाहून गेलेल्या रस्त्यांचा प्रश्न, गाळ्यांचा लिलाव अशा विविध प्रश्नांवर काम करण्याऐवजी २0 टक्के घरफाळा वाढीची मागणी करून ती समितीमार्फत मंजूर करून घेणे अशा या मुख्याधिकाºयांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जनतेला त्रास होत असल्याचेही अनेकांनी मत व्यक्त केले.