शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरसाठी हायड्रोलिक ब्रेकचा कायदा रद्द : केंद्राचा अध्यादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:17 IST

शिरोली : ट्रेलरला हायड्रोलिक ब्रेक यंत्रणा बसवावी यासाठी केंद्र शासनाने २००८ साली ९७/३ हा कायदा करून ट्रेलरचे पासिंग बंद केले होते. हा कायदा तब्बल ९ वर्षांनी केंद्र शासनानेच रद्द केला

ठळक मुद्देपासिंगचा मार्ग मोकळा; उद्योजकांच्या पाठपुराव्याला मोठे यशखासदार धनंजय महाडिक यांना कायदा रद्द करण्याबाबत विनंती

सतीश पाटील ।शिरोली : ट्रेलरला हायड्रोलिक ब्रेक यंत्रणा बसवावी यासाठी केंद्र शासनाने २००८ साली ९७/३ हा कायदा करून ट्रेलरचे पासिंग बंद केले होते. हा कायदा तब्बल ९ वर्षांनी केंद्र शासनानेच रद्द केला असून तसा रद्द केल्याच अध्यादेशही काढला आहे. यामुळे ट्रेलर पासिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. कायदा रद्द करण्यासाठी कोल्हापूरच्या ट्रेलर उद्योजकांचे मोठे योगदान आहे.

ट्रेलरमधून शेतमालाची वाहतूक करताना अपघात होतात म्हणून २००८ साली ट्रेलरला ब्रेक यंत्रणा पाहिजे, असा अध्यादेश केंद्र शासनाने काढला होता आणि देशातील ट्रेलरचे पासिंग बंद झाले.ट्रेलरचे पासिंग पूर्ववत सुरू व्हावे यासाठी ट्रेलर उद्योजकांनी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी तात्पुरते पासिंग सुरू झाले. नंतर ट्रॅक्टर कंपन्यांचे अधिकारी, ट्रेलर उद्योजक, केंद्रीय वाहतूक सचिव यांची दिल्लीत बैठक झाली. यामध्ये ट्रॅक्टरला ब्रेक सप्लाय पॉर्इंट काढण्याचे ठरले, पण दोन वर्षानंतरही ट्रॅक्टरला ब्रेक सप्लाय पॉर्इंट काढला गेला नाही.

अखेर ट्रेलर उद्योजकांनी केंद्रीय अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्याने पुन्हा तात्पुरते पासिंग सुरू झाले. तरीही उद्योजकांनी गडकरी यांना ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बनवणे ही बाबच किचकट, चुकीची व खर्चिक कशी आहे, हे सांगितले. तर खासदार धनंजय महाडिक यांना कायदा रद्द करण्याबाबत विनंती केली.

मंत्री नितीन गडकरी, खासदार महाडिकांनी लोकसभेत ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बनवण्याचा कायदा रद्द करण्याची विनंती केली. त्यानुसार २० सप्टेंबरला लोकसभेत हा कायदा रद्द करण्याबाबत देशातून हरकती मागविल्या. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी ९७/३ हा कायदा रद्द करण्यात आला. याचा अध्यादेश नुकताच केंद्र शासनाने काढला आहे. त्यामुळे देशातील ट्रेलर उद्योजकांचा आणि शेतकºयांचा ट्रेलर पासिंगचा प्रश्न मार्गी लागला आहे. 

गेली नऊ वर्षे ट्रेलरचे पासिंग पूर्ववत सुरू व्हावे यासाठी आम्ही कोल्हापूर ते दिल्ली वारंवार वाºया केल्या. मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार, खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे आणि कोल्हापूरच्या ट्रेलर उद्योजकांच्यामुळे हे शक्य झाले आहे.- युवराज चौगुले, संपर्कप्रमुख आयमाट्रेलर पासिंगसाठी कोल्हापूरचे उद्योजक झटत होतो. या लढ्याला अखेर यश आले आहे. सर्वच लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले. यामुळे शेतकºयांचा मोठा फायदा झाला आहे. आता लवकरच पासिंग पूर्ववत सुरू होईल.- बाबूराव हजारे, ज्येष्ठ उद्योजक, विवेक इंजिनिअरिंगपासिंग पूर्ववत सुरू करावे यासाठी अ‍ॅग्रिकल्चरल इम्प्लिमेंट असोसिएशन (आयमा) आणि ट्रेलर उद्योजक यांचे मोठे योगदान आहे. आमच्या लढ्याला यश आले.- कृष्णात पाटील, माजी अध्यक्ष आयमा