शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोळा वर्षावरील रिक्षा स्क्रॅपचा निर्णय रद्द करा, रिक्षाचालक सेनेचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 17:01 IST

सोळा वर्ष वयोमर्यादा ओलांडलेल्या जिल्ह्यातील अ‍ॅटो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र वाहतुक सेना व महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेतर्फे दाभोळकर कॉर्नर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काहीकाळ या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना काहीकाळ ताब्यात घेवून पोलीसांनी सोडले.

ठळक मुद्देसोळा वर्षावरील रिक्षा स्क्रॅपचा निर्णय रद्द करा, रिक्षाचालक सेनेचे रास्ता रोकोआंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून सोडले

कोल्हापूर : सोळा वर्ष वयोमर्यादा ओलांडलेल्या जिल्ह्यातील अ‍ॅटो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र वाहतुक सेना व महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेतर्फे दाभोळकर कॉर्नर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काहीकाळ या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना काहीकाळ ताब्यात घेवून पोलीसांनी सोडले.राज्य शासनाने २९ डिसेंबर २०१८ ला एका निर्णयानूसार राज्यातील १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या अ‍ॅटोरिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो रिक्षाचालकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यात कोल्हापूरातील हजारो रिक्षाचालकांचा समावेश आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा.

या मागणीसाठी प्रथम वाहतुक सेना व रिक्षाचालक सेनेतर्फे जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यातील आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून शुक्रवारी दुपारी दाभोळकर कॉर्नर चौकात काही काळ रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी जोरदार घोषणा देत हा निर्णय त्वरीत रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान स्टेशनरोडवरील वाहतुक काहीकाळ कोलमडल्यामुळे वाहनधारकांना कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी आंदोलनकर्त्यांना समज देवून सोडून देण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व चालक सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जाधव, वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी केले. यात दिनेश परमार, दिलीप सुर्यवंशी, रमेश पोवार, विष्णूपंत पोवार, वसंत पाटील, योगेश रेळेकर, धनाजी यादव, अशोक जाधव, पुष्पक पाटील, जावेद शेख, भास्कर भोसले, काका मोहीते, संभाजी माने, दिनकर माने, संजय पाटील, विजय ओतारी, राज कापुसकर, सुनील मगदूम, सचिन पोवार, पप्पू गडदे आदींनी सहभाग घेतला.सत्तेत असलेल्या पक्षाच्या रिक्षा संघटनेने आंदोलन करून काहीकाळ वाहतुकीची कोंडी केली. याबद्दल अनेक वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांनी जर सत्तेत असलेल्या पक्षावरच ही वेळ येत असेल तर दुर्दैव असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले.

 कोल्हापूरातील दाभोळकर कॉर्नर चौकात महाराष्ट्र वाहतुक सेना व महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेतर्फे सोळा वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा स्क्रॅप करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी दुपारी रास्ता रोको केल्यामुळे काहीकाळ स्टेशनरोडवरील वाहतुक कोलमडली.

 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर