शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खोडवा उत्पादनात वाढ करणे शक्य

By admin | Updated: December 16, 2014 23:45 IST

पाचट व खत व्यवस्थापन : आंतरपिकेही घेणे किफायतशीर; वीज बिलातही बचत

योग्य व्यवस्थापनातून खोडव्याचे उत्पादन लागणीच्या उसाएवढे मिळविणे शक्य आहे. त्यासाठी पाचट आच्छादन व खतांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. खोडवा व्यवस्थापनावर विशेष भर व लक्ष देऊन अधिक खोडवा घेण्याची पीक पद्धत आणि उन्हाळी वेलवर्गीय काकडी, कलिंगड भाजीपाला यासारखी आंतरपिके घेण्याची पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. खोडव्याचे उत्पादन लागणीच्या उसाइतके किंबहुना त्यापेक्षा जास्त घेता येईल, असे सिद्ध झाले आहे. त्याबाबतच्या व्यवस्थापनाबाबत खालील बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे.पाचट आच्छादन आणि मशागत : ऊस तुटून गेल्यानंतर मिळणारे पाचट जाळून टाकण्यापेक्षा त्याचे एक सरी आड सरी आच्छादन करावे. यामुळे जमिनीचे तापमान योग्य प्रमाणात राहते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो. तणांची वाढ होत नाही. पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते आणि खोडव्याला चांगले फुटवे फुटतात. एकरी अडीच ते तीन टन सेंद्रिय खत, तर वार्षिक दीड कोटी लिटर पाण्याची बचत होते. याबरोबरच विजेची मोठी बचत होते.पाचटाचे आच्छादन करण्यासाठी ऊस तुटून गेल्यानंतर पाचट एक सरी आड एक सरी दाबून बसवून घ्यावे. ऊस लागण जोड ओळ पद्धतीने केली असल्यास रिकाम्या पट्ट्यात पाचट चांगले दाबून बसवावे. जमिनीपासून वर जर उसाची तोडणी झाली असेल तर धारदार कोयत्याने अगर विळ्याने जमिनीलगतपर्यंत ही छाटणी करावी.पाचटाचे आच्छादन न केलेल्या रिकाम्या सरीच्या बगला नांगरीच्या साहाय्याने १५ दिवसांच्या आत फोडून घ्याव्यात. बगला फोडताना बैल पाचटावरून चालल्यास एक तर ते दाबून बसेल अथवा त्याचा भुगा होईल. जर यंत्राच्या म्हणजे रोटावेटर असेल तर बगला फोडल्यानंतर पाचटाचा भुगा करण्यासाठी चांगला वापर करता येईल. यावर एकरी चार किलो पाचट कुजविणारे जिवाणू खत शेणखतात मिसळून पाचटावर पसरावे. त्याचबरोबर एकरी ५० किलो युरिया आणि ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर समप्रमाणात पसरावे.-प्रकाश पाटील, कोपार्डे खोडवा पिकास पहिली खत मात्रा ऊस तुटून गेल्यानंतर १५ दिवसांच्या आत रिकाम्या सरीच्या बगला फोडल्यानंतर खोडवा पिकाच्या एकूण शिफारशीत खतमात्रेपैकी एकरी ३० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची प्रत्येकी २३ किलो मात्रा सरीच्या बगलेत द्यावी. खते दिल्यानंतर बगला फोडल्यानंतर सरीत बळी नांगर चालवावा म्हणजे खत मातीआड होतील आणि पाणी देणे सुलभ होते.मास्की जागा भरणे खोडवा साधारणत: १५ दिवसांपासून दिसायला सुरुवात होते. तुटाळ जागा दिसत असेल तर एक डोळ्याच्या रोपांची पुनर्लागण करून तुटाळ भरून घ्यावे किंवा जेथे रोपांची संख्या दाट आहे तेथील ऊस रोपे काढून तुटाळ भरून घ्यावे. हे काम वापशावर जमीन असताना करावे व पाणी द्यावे.खताचा दुसरा हप्ता आठ आठवड्यांनी खोडव्यास नत्र खताचा दुसरा ३० टक्के हप्ता म्हणजे, एकरी ३० किलो नत्र, युरिया स्वरुपात निंबोळी पेंडीसह घोसळून बाळभरणी करावी.खतांचा तिसरा हप्ता, मोठी बांधणी खोडवा पीक साडेतीन ते चार महिन्यांचे झाल्यानंतर फुटव्याची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि पिकाच्या योग्य वाढीसाठी मोठी भरणी करावी. भरणीपूर्वी रासायनिक खतांचा तिसरा आणि शेवटचा हप्ता म्हणजे खतमात्रेपैकी नत्र ४० टक्के, स्फुरद आणि पालाश उर्वरित ५० टक्के मात्रा उसाला द्यावी.सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खतांची फवारणी खोडवा पीक साधारणत: ६० दिवसांचे झाल्यानंतर मल्टी मॅक्रोन्युट्रीयंट आणि मल्टी मायक्रोन्युट्रियंट या द्रवरूप खताची प्रत्येकी दोन लिटर, २०० लिटर पाणी या प्रमाणात एकत्रित पहिली फवारणी उसाच्या पानावर करावी. या द्रवरूप खतांची दुसरी फवारणी प्रत्येकी तीन लिटर प्रती ३०० लिटर पाण्यात मिसळून ९० दिवसांनी करावी. फवारणी करताना उसाची पाने दोन्ही बाजूंनी पूर्ण भिजतील, याची काळजी घ्यावी.