कोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथील वासंतीदेवी पाटील फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस ड्राईव् अनटिला हेल्थकेअर (जेनेरिक मेडिसीन स्टोअर ) गोवा यांचे मार्फत कॅम्पस राबविण्यात आला. या मुलाखती कम्युनिटी फार्मासिस्ट या पदासाठी घेण्यात आल्या होत्या. मुलाखतीसाठी १०० पेक्षा जास्त उमेदवार उपस्थित होते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष पायघन यांनी दिली. मुलाखती यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्राध्यापक आनंद बाबर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे प्रमुख प्रा. गोरख धुमाळ व प्रा. निखिल पाटील यांनी नियोजन केले. अनटिला हेल्थकेअर गोवाचे उपस्थित मान्यवर मयूर चिंचणीकर, पंकज खडेद, विमा खडेद, विद्यानंद वाघोजी आणि नीलेश खांडेकर यांनी मुलाखती घेतल्या. यासाठी संस्थेचे सचिव मा. डॉ. जयंत पाटील, विश्वस्त मा. विनिता पाटील यांनी मार्गदर्शन केले.
वासंतीदेवी पाटील फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST