शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरातील मोकाट जनावराविरोधात महापालिकेची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:03 IST

कोल्हापूर शहरात रस्त्यांवर मोकाट व भटक्या जनावरांविरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी दिवसभरात या पथकामार्फत ताराबाई पार्क, राजारामपुरी, भवानी मंडप, शिवाजी चौक या परिसरांत विशेष मोहीम राबविली. त्यामध्ये सहा मोकाट गाई पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरातील मोकाट जनावराविरोधात महापालिकेची मोहीमसहा गाई पकडल्या : सोडणाऱ्यांकडून दोन हजार रुपये दंड वसूल

कोल्हापूर : शहरात रस्त्यांवर मोकाट व भटक्या जनावरांविरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी दिवसभरात या पथकामार्फत ताराबाई पार्क, राजारामपुरी, भवानी मंडप, शिवाजी चौक या परिसरांत विशेष मोहीम राबविली. त्यामध्ये सहा मोकाट गाई पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये भटक्या व मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलेला आहे. या जनावरांमुळे वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत असल्याबाबत तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मोकाट जनावरे बंदोबस्त पथकामार्फत आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत एकूण सहा गाई पकडल्या आहेत.

या गार्इंच्या मालकांकडून २००० रुपये दंड भरून घेऊन पुन्हा गाई उघड्यावर न सोडण्याच्या अटीवर परत करण्यात आल्या. या मोहिमेमध्ये विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक करण लाटवडेकर व सहायक आरोग्य निरीक्षक विनोद नाईक व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.शहरातील नागरिक, व्यावसायिक यांनी त्यांची पाळीव जनावरे रस्त्यांवर न सोडता बंदिस्त ठेवावीत. यापुढेही मोकाट जनावरे बंदोबस्त पथकामार्फत नियमितपणे कारवाई करण्यात येणार आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर