शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून ‘कोल्हापूर’ची ‘नियोजन’वर बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:07 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोल्हापूरला ठेंगाच मिळाला आहे. राजेश क्षीरसागर यांना राज्य ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोल्हापूरला ठेंगाच मिळाला आहे. राजेश क्षीरसागर यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘दुधाची तहान ताकावर भागवली’ आहे. दोन खासदार आणि सहा आमदार दिले, अजून कोल्हापूरने काय केले पाहिजे? तेव्हा पक्षात सन्मान मिळू शकेल, अशी विचारणा ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांमधून केली जात आहे.कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. कोल्हापूर शहरात सातत्याने शिवसेनेला यश मिळाले असले तरी सहकाराचे जाळे असलेल्या ग्रामीण भागात मात्र शिवसेनेला लोकांनी स्वीकारले नव्हते. पण सन २००९ ला ‘करवीर’मधून चंद्रदीप नरके आणि ‘हातकणंगले’मधून डॉ. सुजित मिणचेकर यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला तर शहरातून काँग्रेसचे मालोजीराजे यांचा राजेश क्षीरसागर यांनी पराभव केला. त्यानंतर सन २०१४ निवडणुकीत स्वतंत्र लढूनही सेनेचे दहापैकी सहा आमदार विजयी झाले. त्यामुळे कोल्हापूरला एक मंत्रिपद मिळणार, याची खात्री होती. मंत्रीपदासाठी सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके व राजेश क्षीरसागर यांनी फिल्डिंग लावली होती. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांच्या पराभवाचे उद्धव ठाकरे यांच्या मनातील शल्यच मंत्रिपदाच्या आड येत असल्याचे शिवसेना नेते खासगीत सांगत होते. त्यामुळे सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांसह जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांच्या टीमने आक्रमक प्रचार यंत्रणा राबवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या रूपाने शिवसेनेला दोन खासदार मिळाले. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसैनिकांच्या आशा वाढल्या होत्या. रविवारी विस्तारात मात्र कोल्हापूरकरांना उद्धव ठाकरे यांनी ‘कात्रजचा घाट’ दाखविल्याने नाराजी व्यक्त होत आहे.राजेश क्षीरसागर यांना जरी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असला तरी प्रत्यक्ष मंत्री आणि दर्जा असणे वेगळे आहे. यापूर्वी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात सन २००९ मध्ये राष्टÑवादीचे दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांना नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्षपद देत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कुपेकर यांचे बंड थंड केले होते.ठाकरेंचे विधान परिषदेवरचे प्रेम कायमसत्ता स्थापन करताना शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या बारा मंत्र्यांपैकी निम्म्या जागांवर विधान परिषदेच्या सदस्यांना संधी दिल्याने लोकांमधून निवडून गेलेल्या प्रतिनिधींमध्ये असंतोष होता. आताही एक पद राष्टÑवादीतून आलेले जयदत्त क्षीरसागर यांना, तर दुसरे यवतमाळमधून विधान परिषदेवर गेलेले तानाजी सावंत यांना देऊन ठाकरे यांनी विधान परिषदेवरचे प्रेम कायम राखल्याची चर्चा आहे.विभागनिहाय बजेटचे नियोजन करणेअर्थमंत्री प्रत्येक विभागाला बजेट देतात, त्याच्या नियोजनाची जबाबदारी या ‘नियोजन’ मंडळावर असते. क्षीरसागर कार्याध्यक्ष म्हणून जादा बजेट आणू शकतात.शिवसेनेकडून आतापर्यंत कोल्हापूरला ही पदे मिळालीसंजय पवार, उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)- आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ.वैशाली क्षीरसागर, कोषाध्यक्ष - पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीविजय देवणे, संचालक - उर्वरितविकास महामंडळशिवाजी जाधव, सदस्य - पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती.सुनील शिंत्रे, सदस्य - खनिकर्म महामंडळमुरलीधर जाधव, सदस्य - हातमाग महामंडळ