शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाल सापडल्याचा कांगावा म्हणजे बदनामीचे षङ्‌यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 11:20 IST

cctv Kolhapur-जेवणात पाल सापडल्याचा बहाणा करून कांगावा करण्याचा प्रकार म्हणजे हॉटेलच्या बदनामीचे षङ्‌यंत्र आहे. या घटनेचे चित्रीकरण पाहिल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत आल्याचे मनोरा हॉटेलचे मालक निवास बाचूळकर यांनी शनिवारी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही दाखविले. या घटनेचा कोल्हापूर हॉटेल मालक संघानेही निषेध करून चौकशीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देपाल सापडल्याचा कांगावा म्हणजे बदनामीचे षङ्‌यंत्रमनोरा हॉटेलचे स्पष्टीकरण : सीसीटीव्ही चित्रीकरण सादर

कोल्हापूर : जेवणात पाल सापडल्याचा बहाणा करून कांगावा करण्याचा प्रकार म्हणजे हॉटेलच्या बदनामीचे षङ्‌यंत्र आहे. या घटनेचे चित्रीकरण पाहिल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत आल्याचे मनोरा हॉटेलचे मालक निवास बाचूळकर यांनी शनिवारी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही दाखविले. या घटनेचा कोल्हापूर हॉटेल मालक संघानेही निषेध करून चौकशीची मागणी केली आहे.बाचूळकर म्हणाले, शनिवारी (दि.२७) रात्री दहा ते बारा तरुण हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले होते. कडेला बसलेल्या तरुणाने जेवण सुरू असतानाच मित्राची डीश आपल्यासमोर घेऊन मागील खिशातून पाल काढून त्या भाजीमध्ये टाकली असल्याचे दिसते. तो तरुण ही भाजी चमच्याने मिक्स करतो व डीश मित्राज‌वळ देतो. मित्र त्यातील भाजी वाढून घेऊन त्यातील पाल शोधतो, पण त्याला ती सापडत नाही.

शेजारचा मित्र पाल शोधून काढतो आणि समोरच्या मोकळ्या डीशमध्ये ठेवून मित्राला व्हिडिओ बनवायला सांगतो हे सगळे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे. त्यानंतर मोबाइलवर त्यांनी जेवणामध्ये पाल सापडल्याचे चित्रीकरण केले. त्यासोबतच कर्मचाऱ्यांसोबतच हुज्जत घातली.

या तरुणांनी हॉटेलचे नाव वापरून तातडीने त्याची क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल केली. हा प्रकार म्हणजे हॉटेलची बदनामी करण्याचे षङ्‌यंत्रच आहे. त्यामुळे संबंधित तरुणांवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीkolhapurकोल्हापूर