शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

चल गं सये वारुळाला... कोल्हापुरात नागपंचमी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 20:57 IST

आदित्य वेल्हाळ कोल्हापूर, दि. 27 - घरोघरी मातीच्या नागमूर्तींची प्रतिष्ठापना, लाह्या, कडबोळ्यांचा नैवेद्य, मंदिरांमध्ये पंचामृत, आरती, प्रसाद वाटप, भजन-कीर्तन ...

आदित्य वेल्हाळकोल्हापूर, दि. 27 - घरोघरी मातीच्या नागमूर्तींची प्रतिष्ठापना, लाह्या, कडबोळ्यांचा नैवेद्य, मंदिरांमध्ये पंचामृत, आरती, प्रसाद वाटप, भजन-कीर्तन अशा उत्साही वातावरणात गुरुवारी नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त कोल्हापुरातील नागाळा पार्कातील तसेच फुलेवाडी रिंग रोड येथील नागोबा मंदिरात विशेष पूजाअर्चा करण्यात आली; तर सांगवडे (ता. करवीर) सारख्या ग्रामीण भागातील महिलांनी प्रत्यक्ष नागाची पूजा केली. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून महिलांचे आवडते सण सुरू होतात. यानिमित्त घरोघरी प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या नागमूर्तीची पूजा करून कडबोळ्याचा नैवेद्य दाखविण्यात आला. नागाळा पार्कमधील नागोबा मंदिरात महाप्रसाद, वृक्षारोपण, परिसर सौंदर्यीकरण व बालोद्यानाचे उद्घाटन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर हसिना फरास उपस्थित होत्या. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट म्हणून टाकाऊ पदार्थ व वस्तूंमधून साकारलेले बालोद्यान सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. होळकर सामाजिक संस्थेने रोपवाटपाचा उपक्रम राबविला. उपमहापौर अर्जुन माने यांनी उत्सवाचे नियोजन केले. यावेळी आनंद माने, दिलीप मोहिते, नगरसेवक दिलीप पोवार उपस्थित होते. फुलेवाडी रिंग रोडवरील जिल्हा परिषद कॉलनी येथे साकारण्यात आलेल्या हेमाडपंथी नागोबा मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांनी डोळ्यांवर पट्टी बांधून मडके फोडणे, झिम्मा-फुगडी यासारख्या खेळांचा आनंद लुटला.  महापालिकेच्या कर्मचा-यांनीही महापौरांच्या हस्ते दूधवाटपाचा उपक्रम आयोजित केला. यावेळी शंकर तावडे, अरुण जमादार, रवी पोवार, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, विजय वणकुद्रे, अजित तिवले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. फुलेवाडी रिंग रोड येथील कर्मवीर स्कूलमध्ये विविध जातींच्या विषारी व बिनविषारी सर्पांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सापांविषयी व प्राथमिक उपचारासंबंधी माहिती देण्यात आली. तसेच सर्पांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. स्वाती डावरे, सुलोचना दिवटे, लता नायर, संगीत भांबे, अश्विनी पाटील यांच्यासह शिक्षक व कर्मचाºयांनी संयोजन केले. झोक्यांचा आनंद दुर्मीळ... या सणापासून महिलांचे पारंपरिक खेळ सुरू होतात. नागपंचमीला झाडाला दोरीचा झोका बांधून महिला व मुली उंचच उंच झोके घेत या खेळाचा आनंद लुटतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून शहरी भागातून असे झोकेच गायब झाले आहेत. ग्रामीण भागांतही मोजक्याच ठिकाणी झोके बांधले जातात. ही बाब ओळखून नागाळा पार्कातील नागोबा मंदिराच्या परिसरात झोका बांधण्यात आला होता. सांगवडे येथेही महिलांनी झोक्याचा आनंद घेतला.