शहरं
Join us  
Trending Stories
1
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
2
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
3
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
4
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
5
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
6
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
7
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
8
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
9
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
10
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
11
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
12
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
13
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
14
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
15
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
16
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
17
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
18
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
19
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
20
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
Daily Top 2Weekly Top 5

घाऊक बाजारात कोबी दोन रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्थानिक भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्याने दरात मोठी घसरण होत आहे. घाऊक बाजारात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : स्थानिक भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्याने दरात मोठी घसरण होत आहे. घाऊक बाजारात कोबी मातीमोल दराने विकावे लागत असून दोन रुपये किलो दर झाला आहे. वांग्याच्या दरातही घसरण झाली आहे, किरकोळ बाजारात दहा रुपये किलो दर आहे. सरकी तेलाच्या दरात मात्र तेजी असून किरकोळ बाजारात १४० रुपये दर झाला आहे.

साधारणत: जानेवारीपासून स्थानिक भाजीपाल्याची आवक सुरू होते. त्यामुळे भाजीपाल्याचा दरात घसरण होते, हे जरी खरे असले तरी यंदा जरा जास्तच दर घसरले आहेत. कोबीचा हिरवागार गड्डा मातीमोल दराने विकावा लागत आहे. घाऊक बाजारात दोन तुपये किलोने कोबीचा दर झाला आहे. वांग्याची आवकही वाढली आहे, बाजार समितीत ६०० करंडीची आवक रोज होते. त्याचबरोबर स्थानिक वांग्याची आवकही वाढली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात दहा रुपये किलोपर्यंत दर आला आहे. टोमॅटोच्या दरातही घसरण झाली असून पंधरा रुपयाला दीड किलो दर आहे. ढब्बू, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचे दर वीस रुपये किलोच्या आत आहे. ओल्या वाटाण्याच्या दरातही काहीसी घसरण झाली असून ४० रुपये किलो आहे. घेवडा, गवारी तेजीत आहे. कोथंबिरची आवकही जास्त असल्याने किरकोळ बाजारात २५० रुपये शेकड्याचा दर आहे. मेथी, पालक व पोकळ्याचा दर शेकडा ३०० रुपये दर राहिला आहे.

कडधान्य मार्केटमध्ये दरात फारशी चढउतार पाहावयास मिळत नाही. तूरडाळ ११०, हरभरा डाळ ६५, मूगडाळ ११० रुपये किलो आहे. सरकी तेल १४० रुपये किलोवर असून ‘ब्याडगी’ मिरची ३०० ते ३५० रुपये किलो तर ‘सिजेंटा’ मिरची २५० ते ३०० रुपये किलो आहे. खोबऱ्याच्या दरात किलो मागे वीस रुपयांची वाढ झाली आहे.

आल्ले ३० रुपये किलो

चटणीचा हंगाम सुरू झाल्याने या कालावधीत आल्लेचे दर काहीसे चढे राहतात. मात्र, या आठवड्यात आल्याच्या दरात घसरण झाली असून किरकोळ बाजारात ३० किलो आहे.

कलिंगडांचे ढीग

उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे फळांची मागणी वाढली आहे. कलिंगडेो ढीग बाजारात दिसत असून काळ्या पाठीचे कलिंगडे पाच रुपयांना मिळत आहे.